शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सातारा :  गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची सुरुवात पालिकेपासून, प्रशासनाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 15:25 IST

सातारा शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर पालिकेचा भर असून, विसर्जन मिरवणुकीचे ठिकाण बदलण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयाच्यामागे रिसालदार तळ्यात मूर्ती विसर्जन होणार असून, विसर्जन मिरवणूक राजवाड्यावरून सुरू न होता आता ती पालिका कार्यालयापासून होणार आहे, असे स्पष्टीकरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

ठळक मुद्देगणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची सुरुवात पालिकेपासून, प्रशासनाची माहिती रिसालदार तलावात होणार गणेशमूर्ती विसर्जनपर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिका आग्रही

सातारा : शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर पालिकेचा भर असून, विसर्जन मिरवणुकीचे ठिकाण बदलण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयाच्यामागे रिसालदार तळ्यात मूर्ती विसर्जन होणार असून, विसर्जन मिरवणूक राजवाड्यावरून सुरू न होता आता ती पालिका कार्यालयापासून होणार आहे, असे स्पष्टीकरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.गणेशोत्सवा तयारीच्या अनुषंगाने पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात गणेशोत्सव मंडळांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पोलीस उपअधीक्षक ....राजमाने, साविआच्या पक्षप्रतोद स्मिता घोडके, विरोधी पक्षनेते अशोक मोने, सभापती मनोज शेंडे, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, सविता फाळके, स्नेहा नलवडे, लता पवार, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे यांची उपस्थिती होती.गणेश विसर्जनाचा प्रश्न पालिकेने निकाली काढला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागणीनंतर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी रिसालदार तलाव गणेशमूर्ती विसर्जनासाठी उपलब्ध करून दिला. या निर्णयामुळे विसर्जनाचा प्रश्न निकाली निघाला आहे.

विसर्जन मिरवणुका राजवाडा येथून सुरू होत होत्या. आता त्या नगरपालिका कार्यालयासमोरून सुरू होतील, असे स्पष्टीकरण पालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.दरम्यान, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेने बक्षीस योजना जाहीर करावी, प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा शाडूच्या मूर्ती तुलनेने महाग पडतात, त्यामुळे पालिकेने काही अनुदान स्वरुपात नागरिकांना मदत करावी, निर्माल्याच्या माध्यमातून चांगली खतनिर्मिती होऊ शकते, त्यामुळे पालिकेने निर्माल्य गोळा करण्याची उपाययोजना करावी, अशा काही सूचनाही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केल्या.

गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा सातारा शहराला आहे. पालिकेचे पूर्ण सहकार्य मंडळांना राहणार आहे. अनेकदा मंडळांच्या शेजारी ट्रॅफिक जामची समस्या होत असते. ती होऊ नये, यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पोलीस प्रशासनानेच त्यांच्यावर कोंडी सोडविण्याची जबाबदारी द्यावी.- स्मिता घोडके 

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सर्वांनीच पालिकेला सहकार्य करावे. गणेशमूर्तींची उंची कमी ठेवली तर अनेक समस्या दूर होतील. मिरवणूकही सुरळीत पार पडेल.- वसंत लेवे 

मूर्ती विसर्जनानंतर तळी स्वच्छता मोहीम पालिकेने तत्काळ राबवावी. यासाठी सार्वजनिक मंडळे आपल्या वर्गणीतील काही रक्कम पालिकेला देतील. मात्र वर्षानुवर्षे तळी साफ झाली नाही तर आजूबाजूला राहणाऱ्यांना त्याचा त्रास होतो.- श्रीनिवास जाधव

अतिक्रमण करणाऱ्यांमुळे गणेशोत्सवात मोठा त्रास सोसावा लागणार आहे. फूटपाथवर खोकी टाकली जात असल्याने लोकांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे ही अतिक्रमणे गणेशोत्सवाआधी काढावीत.- जितेंद्र वाडकर 

शिवाजी सर्कल गणेशोत्सव मंडळाला हवी पर्यायी जागाग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पोवईनाक्यावर रस्ता फोडण्यात आला आहे. येथे शिवाजी सर्कल गणेशोत्सव मंडळाच्या वतीने उत्सव साजरा केला जातो. यंदा मात्र जागेअभावी उत्सव साजरा करण्यावर प्रश्नचिन्ह असून, ७५ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या या मंडळाला उत्सव साजरा करण्यासाठी जागा उपलब्ध करावी, तसेच रविवार पेठेतून पोवई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावरही आणखी तीन मंडळे उत्सव साजरा करातात, त्यांचीही सोय करावी, अशी मागणी नगरसेवक श्रीकांत आंबेकर यांनी केली.गणेशोत्सव बैठकीला अनेक नगरसेवकांची दांडीगणेशोत्सव बैठक ही संपूर्ण शहराच्या दृष्टिने महत्त्वाची असते. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने गणेशोत्सव मंडळे काही महत्त्वाचे निर्णय घेत असतात. या बैठकीला नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र मोजकेच नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवSatara areaसातारा परिसरMuncipal Corporationनगर पालिका