शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

Satara: हॉटेलमध्ये जेवण करून जाणाऱ्याला लुटले; तिघांच्या मुसक्या आवळल्या 

By नितीन काळेल | Updated: March 16, 2024 19:23 IST

सातारा : हाॅटेलमधून रात्री जेवण करुन घरी जाणाऱ्या तरुणाला अपहरण करुन लुटणाऱ्या तिघांच्या मुसक्या सातारा शहर पोलिसांनी आवळल्या. तसेच ...

सातारा : हाॅटेलमधून रात्री जेवण करुन घरी जाणाऱ्या तरुणाला अपहरण करुन लुटणाऱ्या तिघांच्या मुसक्या सातारा शहर पोलिसांनी आवळल्या. तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईलसह ७५ हजारांचा एेवज जप्त करण्यात आला आहे. तर हे लुटारु पोलिसांच्या रेकाॅर्डवरील असून सातारा तालुक्यातील रहिवाशी आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ११ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास एक तरुण साताऱ्यातील आैद्योगिक वसाहतीतील एका हाॅटेलमध्ये जेवण करुन घरी चालला होता. त्यावेळी अनोळखी तिघांनी जबरदस्तीने दुचाकीवर बसवून त्याला जानाई मळाई डोंगराच्या पायश्याला नेले. त्या ठिकाणी अंधारात त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल जबरदस्तीने घेतला व पळून गेले. त्यानंतर तरुणाने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल, पोलिस उप अधीक्षक राजीव नवले यांनी शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांना गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना केली. त्यानंतर निरीक्षक म्हस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तयार करुन लुटारुंचा शोध घेण्याची सूचना केली. त्यावेळी संशयित हे पोलिसांच्या रेकाॅर्डवरील असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर त्यांना कारंडवाडी, सोनवडी परिसरातून ताब्यात घेतले. विनीत संजय कदम (वय २१, रा. झेंडा चाैक नवीन आैद्योगिक वसाहत सातारा), मनोहर विठ्ठल भोसले (वय २३, रा. कारंडवाडी बसथांब्याशेजारी, सातारा) आणि धीरज धर्मेंद्र बोधे (वय १९, रा. सोनवडी, ता. सातारा) अशी आहेत.पोलिस निरीक्षक म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने, उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, नीलेश जाधव, गोसावी, पंकज मोहिते, विक्रम माने, इरफान मुलाणी, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, सुशांत कदम, अजित माने तसेच सायबर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

निष्पन्न झाल्यानंतर धरपकड..गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांना शोधण्यासाठी तत्काळ सूत्रे हलविली. त्यासाठी विविध पातळीवर माहिती घेण्यात आली. चोरी जेथे झाली आहे, त्याच परिसरातील संशयित असण्याची शक्यता धरुन तपास सुरू केला. त्यावेळी लुटारू हे पोलिसांच्या रेकाॅर्डवरील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांची धरपकड करण्यात आली. पोलिसांनी चोरीतील मोबाइल, रोख रक्कम आणि आरोपींची दुचाकी असा ७५ हजार रुपयांचा एेवज जप्त केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस