शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वारांना मारहाण करुन लुटायचा, सातारा पोलिसांनी सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेड्या

By दत्ता यादव | Updated: December 29, 2022 19:28 IST

अवघ्या चार दिवसात हा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला

सातारा : लिफ्ट मागून दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. विशेष म्हणजे अवघ्या चार दिवसात हा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणेश बाळासाहेब शिंदे (रा. तांबवे, ता. फलटण) हे सोमवार, दि. २६ रोजी साताऱ्यातील नातेवाइकांना भेटण्यासाठी आले होते. रात्री साडेदहा वाजता ते दुचाकीवरून अजंठा चौकाकडे निघाले होते. त्यावेळी सिव्हिल हॉस्पीटलसमोर एका तरूणाने त्यांना लिफ्ट मागितली. त्याला दुचाकीवरून पाठीमागे बसविले. अजंठा चौकातील ब्रीजखाली पोहोचल्यानंतर अनोळखी व्यक्तीने त्यांना अचानक मारहाण करण्यास सुरूवात केली. तेथील लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांना बेशुद्ध पाडले. त्यानंतर त्यांच्याजवळील मोबाइल, सोन्याची चेन, अंगठी हिसकावून घेतलीच शिवाय त्यांची दुचाकीही चोरट्याने चोरून नेली होती. जखमी गणेश शिंदे यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सातारा शहर पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे कर्मचारी करत होते. यावेळी त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा एका सरार्इत गुन्हेगाराने केला असून, तो संगम माहुली परिसरातील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन दत्तात्रय सर्जेराव साळेकर (वय ३५, रा. वरची आळी, वेताळदेव, मंदिराशेजारी, संगम माहुली सातारा) याला अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरलेली दुचाकी, मोबाइल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर यापूर्वी खून, जबरी चोरी, मारामारी अशा प्रकारचे पाचहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलिस नाइक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, संतोष कचरे आदींनी ही कारवार्इ केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस