शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कार उभ्या ट्रकला धडकली, दोन महिलांचा मृत्यू; ईदच्या खरेदीसाठी पुण्याला जाताना अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 15:54 IST

या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. हा अपघात रविवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजता झाला.

सातारा : साताऱ्यातून ईदच्या खरेदीला पुण्याला जाताना पाचवडजवळ महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून कारने भीषण धडक दिली. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. हा अपघात रविवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजता झाला.

नाहीद जमीर शेख (वय ३८, रा. शनिवार पेठ, सातारा), सलमा इरफान मोमीन (४१, रा. सांगली), अशी अपघातात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत तर कैफ इरफान मोमीन (१४), इरफान इकबाल मोमीन (४०, दोघेही रा. सांगली), बशीर महामूद शेख (७३, रा. शनिवार पेठ, सातारा), चालक सलमान मोहम्मद पठाण (२३, रा. मेढा, ता. जावळी), अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

साताऱ्यात शनिवार पेठेत राहणाऱ्या साहिल शेख यांच्याकडे सांगलीत राहणारी त्यांची बहीण सलमा व त्यांचे पती आणि दोन मुलांसमवेत त्या शुक्रवारी आल्या होत्या. ईद काही दिवसांवर असल्याने ईदच्या खरेदीसाठी मोमीन आणि शेख कुटुंबीयांनी पुण्याला जायचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी मेढ्यावरून कार बोलावली. रविवारी सकाळी सर्व जण कारने पुण्याला निघाले. पाचवड, ता. वाईजवळ गेल्यानंतर महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला कारची पाठीमागून जोरदार धडक बसली. 

हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील दोन्ही महिला गाडीतून बाहेर फेकल्या गेल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि हाता-पायाला गंभीर जखमा झाल्या. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील इतर प्रवासीसुद्धा जखमी झाले. या अपघातानंतर जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. अपघातात दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याचे समजताच साताऱ्यातील नातेवाइकांनीजिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. नातेवाइकांनी केलेला आक्रोश अक्षरश: काळीज पिळवटून टाकणारा होता. या अपघाताची भुईंज पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झाली नव्हती.ओव्हरटेक करताना अपघात.. -चालक सलमान पठाण हा कार वेगात चालवत होता. महामार्गालगत ट्रक उभा आहे. हे दिसत असतानाही त्याने  ओव्हरटेक करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. चालकाची बाजू त्याने थोडीफार वाचवली. कट मारल्यामुळे पाठीमागे बसलेल्या महिला बाहेर फेकल्या गेल्या. मात्र, चालक नाट्यमयरीत्या अपघातातून बचावला. कारच्या उजव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे.   

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू