शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याची एसटी बनली आता कॅशलेस !

By admin | Updated: February 15, 2017 22:42 IST

दोन स्वाईप मशीन दाखल : विनाथांबा अन् आरक्षण खिडकीत पाकिटाला हात न लावताही मिळणार तिकीट

सातारा : नोटाबंदीच्या निर्णयानंतर दिल्लीपासून गल्लीपर्यंत खऱ्या अर्थाने अर्थक्रांती घडली. सर्वसामान्य नागरिकही पेटीएम, स्वाईप यंत्रांद्वारेच अनेक दैनंदिन व्यवहार करू लागले. या बदलाच्या दिशेनेच एसटीनेही एक पाऊल टाकले आहे. सातारा आगारात मंगळवारपासून दोन स्वाईप मशीन दाखल झाल्या आहेत. साताऱ्यातून पुणे, मुंबईला दररोज हजारो लोक जात असतात. त्याठिकाणी मोठा खर्च होतो. मात्र, तिकिटातच निम्मे पैसे खर्च झाल्यामुळे त्याठिकाणी गेल्यास एटीएम मशीन शोधावे लागतात. तेथे रांगेत वेळ गेला तर कामे खोळंबतात. त्यामुळे अनेक व्यापारी रोख रक्कम खिशात नेतात. मोठी रोकड जवळ बाळगणेही धोक्याचे ठरते. एसटीने कॅशलेस व्यवहार आणल्याने बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे.राज्य परिवहन महामंडळाने नेहमीच नव्या बदलांना आत्मसात केले. एसटीच्या स्थापनेपासून आंतरबाह्य रचनेत वेळोवेळी बदल केले. खासगी प्रवासी वाहतुकीकडे चाललेल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक आसन व्यवस्था, स्वच्छता राखण्याकडे कटाक्ष अन् प्रवाशांना अभिवादन, असे उपक्रम राबविले होते. त्यातील काहींना कर्मचाऱ्यांकडूनच फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी नव्या बदलांना आत्मसात करण्याचे कमी केले नाही.व्यवहारातून जुन्या नोटा हद्दपार झाल्यानंतर बाजारपेठेत काही काळासाठी आर्थिक मंदी निर्माण झाली. लोकांकडे पैसाच नसल्याने केंद्र सरकारने नवा पर्याय समोर दिला. पेटीएम, स्वाईप कार्ड, आॅनलाईन पेमेंट प्रणाली वापरण्याचा सल्ला दिला जाऊ लागला. ही घटना सर्वसामान्यांच्या जीवनासाठी कलाटणी देणारी ठरली. यातून सर्वसामान्यांची एसटीही सुटलेली नाही.असंख्य तरुण सातारकर उच्च शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने पुणे-मुंबईत स्थायिक झाले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर स्वाईप कार्ड, पेटीएम किंवा ई-पेमेंटचा वापर करण्याकडे त्यांचा कल सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात सातारा-पुणे, सातारा-मुंबई विनाथांबा या सुविधा म्हणजे अर्थवाहिनी ठरल्या आहेत. त्यामुळेच या सेवेत नवीन, निमआराम गाड्यांचा वापर मोठ्या संख्येने केला जाऊ लागला. या सेवेचा सर्वाधिक लाभ उच्चशिक्षित मंडळींकडून केला जातो. हाच विचार करून या सेवेत आणखी एका आधुनिक सुविधेचा समावेश केला आहे. सातारा विभागाने दोन स्वाईप मशीन खरेदी केले आहेत. त्यातील एक विनाथांबासाठी तर दुसरे यंत्र संगणकीकृत आरक्षण खिडकीत कार्यान्वित केले आहेत. या योजनेचा प्रारंभ विभागीय लेखाधिकारी दीपाली कुलकर्णी, वरिष्ठ आगार व्यवस्थापक नीलम गिरी यांच्या हस्ते करण्यात आला. (प्रतिनिधी)