शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

सातारा : दुष्काळी भांडवलीचं सौंदर्य, श्रमदानानंतर रूप पालटलं, पर्यटकांची पावले वळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 14:38 IST

काश्मीरच्या सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते; पण हेच सौंदर्य माणसारख्या दुष्काळी तालुक्यात पाहावयास मिळाले तर आश्चर्यचकीत होण्याची वेळ येईल. हो आता हे घडलं आहे ते भांडवली गावात. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या गावात याचा प्रत्यय येत असून, नालाबांध तुडुंब असून पाणी निळाशार जलाशयासारखे दिसत आहे.

ठळक मुद्देदुष्काळी भांडवलीचं सौंदर्य, श्रमदानानंतर रूप पालटलं नालाबांध तुडूंब; पर्यटकांची पावले वळली

नितीन काळेल/सचिन मंगरूळे म्हसवड : काश्मीरच्या सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते; पण हेच सौंदर्य माणसारख्या दुष्काळी तालुक्यात पाहावयास मिळाले तर आश्चर्यचकीत होण्याची वेळ येईल. हो आता हे घडलं आहे ते भांडवली गावात. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या गावात याचा प्रत्यय येत असून, नालाबांध तुडुंब असून पाणी निळाशार जलाशयासारखे दिसत आहे. तर आता येथे पर्यटकांचीही पावले वळत असून यावर्षी दहा हजार झाडे लावण्यात येणार आहेत.पाणी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेली वॉटर कप स्पर्धा राज्यालाच दिशा देऊन गेली. या स्पर्धेत माण तालुक्याने मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम केले आहे. या तालुक्यातीलच भांडवली गाव हे खऱ्या अर्थाने पाण्याचे भांडवल ठरले. तालुक्याची वार्षिक पावसाची सरासरी सुमारे ४५० मिलीमीटर एवढी आहे. तर आतापर्यंत भांडवली गावात २५० मिलीमीटर ऐवढा पाऊस झालेला आहे.

मोठे सहा ते सात पाऊस झाले. त्यामुळे नालाबांध, सीसीटी, डीपसीसीटी, तलावात पूर्ण पाणीसाठा झाला आहे. ओढ्यातून पाणी वाहून न जाता ते अडले गेले. त्यामुळे जागोजागी पाणी दिसत आहे. यामुळे आपण काश्मीरमध्ये असल्याचा साक्षात्कार घडत आहे.माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडीपासून तसेच सुमारे १५ किलोमीटरवर असलेले हे गाव आहे. तब्बल १५ हून अधिक दऱ्यात पहुडलेल्या या गावात अनेक गावांची तहान भागविण्याची ताकद आहे. त्यामुळेच दरवर्षी टंचाईच्या काळात गावातून पाण्याचे टँकर भरभरून जात असतात.

मुळातच स्वत:ची गरज भागवून या गावाने माणदेशी मातीतील अनेक गावांची तहान भागवण्याचे काम केलं आहे. आजही माण तालुक्यात पाणी पोहोचविणारे टँकर याच भांडवली गावातून भरून जातात याचा सार्थ अभिमान भांडवलीकरांना वाटत आहे.वॉटर कप स्पर्धेतील ४५ दिवसांने गावात चमत्कारच झाला. गावातील लोकांनी श्रमदान करून कामाचा प्रचंड डोंगर निर्माण केला. उद्दिष्टापेक्षा कितीतरी पटीने जास्त काम झालं अन् विश्वास बसणार नाही एवढं जबरदस्त काम निर्माण करण्यात आलं. निसर्गानेही गावाला साथ दिली. आजपर्यंत पाच-सहा वेळा पाऊस कोसळला. खोऱ्यातील आणि डोंगरमाथ्यावरील पाण्याने नालाबांध, समतल चरी भरून गेल्या.एक दिवसाचे पावसाळी डेस्टिनेशनयेथील सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालायला लावणारे असेच आहे. म्हणूनच या गावाकडे पर्यटकांचे पाय वळू लागले आहेत. पुण्या-मुंबईचे पर्यटक गावाला भेट देऊ लागले आहेत. भविष्यात संपूर्ण एका दिवसाचे पावसाळी डेस्टिनेशन म्हणून भांडवली या गावकडे पाहिले जाईल, यात शंका नाही अशीच स्थिती आहे आणि हाच भाव संपूर्ण ग्रामस्थांच्या डोळ्यांमध्ये चमकतोय.आता फळबाग, दुग्ध व्यवसायावर भरभांडवलीचा ५० टक्के भाग हा डोंगराळ आहे. त्यामुळे येथे कांदा, टोमॅटो, ज्वारी, गहू, बाजरी ही मुख्य पिके असायची. गेल्या चार वर्षांपूर्वी अस्तित्व संस्थेच्या माध्यमातून गाव परिसरात बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे पाणी उपलब्ध झाले. तर आताच्या जलसंधारणामुळे पाणीसाठा मुबलक झाला आहे. त्यामुळे फळबाग आणि दुग्ध व्यवसायावर भर देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा