सातारा बाजार समितीचे भाजीचे होलसेल मार्केट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 15:18 IST2021-05-17T15:16:01+5:302021-05-17T15:18:10+5:30

CoronaVirus Satara : सातारा जिल्हा परिषद मैदानावर पाणी आणि चिखल असल्यामुळे सातारा बाजार समितीचे भाजीचे होलसेल मार्केट मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत चार दिवस बंद राहणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

Satara Bazar Samiti's vegetable wholesale market closed | सातारा बाजार समितीचे भाजीचे होलसेल मार्केट बंद

सातारा बाजार समितीचे भाजीचे होलसेल मार्केट बंद

ठळक मुद्देसातारा बाजार समितीचे भाजीचे होलसेल मार्केट बंदकोरोना विषाणूचे संकट, मार्केटमध्ये गर्दी

सातारा : जिल्हा परिषद मैदानावर पाणी आणि चिखल असल्यामुळे सातारा बाजार समितीचे भाजीचे होलसेल मार्केट मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत चार दिवस बंद राहणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचे संकट असतानाही छत्रपती शाहू मार्केटमध्ये गर्दी होत होती. त्यामुळे सातारा बाजार समितीने भाजीचे होलसेल मार्केट जिल्हा परिषद मैदानावर तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित केलेले आहे. सध्यस्थितीत तौक्ते चक्रीवादळामुळे वारा जोरात सुटला असून पाऊसही होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद मैदानावर पाणी असून चिखलही झाला.

परिणामी शेतमालाचे नुकसान होत आहे. त्यामुळे सर्व आडत व्यापारी व जिल्हा उपनिबंधकांशी चर्चा करुन १८ ते २१ मे या दरम्यान, जिल्हा परिषद मैदानावरील भाजीचे होलसेल मार्केट पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. शनिवार, दि. २२ पासून भाजी मार्केट पूर्ववत सुरू होणार आहे, अशी माहिती सचिव रघुनाथ मनवे यांनी दिली आहे.
 

Web Title: Satara Bazar Samiti's vegetable wholesale market closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.