शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

सातारा : वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने औंध-पुसेसावळी वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 11:25 IST

खटाव तालुक्याला रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यांने सोमवारी पहाटे चारच्या सुमारास औंध-पुसेसावळी रस्त्यावर वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

ठळक मुद्दे वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने औंध-पुसेसावळी वाहतूक ठप्पखटाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

औंध (सातारा) : खटाव तालुक्याला रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यांने सोमवारी पहाटे चारच्या सुमारास औंध-पुसेसावळी रस्त्यावर वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

औंध परिसरात आज पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह जोरदार वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. त्याच दरम्यान पाऊस ही सुरू झाला. या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात औंध-पुसेसावळी रस्त्यावर वडी येथे वडाचे झाड पडल्याचा मोठा आवाज झाला. झाड रस्त्याच्या मधोमध पडले. पहाटेची वेळ असल्याने वाहतूक नसल्याने कोणतीही हानी झाली नाही.

दरम्यान, सातारा-सांगली जाणाऱ्या रस्त्यावर वडी येथे वडीचे झाड उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाल्याने सकाळी औंधवरून पुसेसावळी व पुसेसावळीकडूून औंधकडे जाणारी वाहतूक थांबली आहे. काही वाहनांनी नवीन झालेल्या कळंबी-गणेशवाडी-औंध-रस्त्याचा वापर केला. पुसेसावळीतून औंधमार्गे सातारा जाणारी वाहतूक नागझरी, वाठार, रहिमतपूर अशी सुरू होती.फांद्या कापण्यास सुरूवातपडलेल्या वडाच्या झाडाला हटविण्यासाठी प्रशासनाची वाट न पाहता वडी ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास झाड हलविण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. मोठ्या फांद्या कुऱ्हाड व इतर अवजारांच्या मदतीने कमी करून एका बाजूने वाहनांना रस्ता उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmonsoon 2018मान्सून 2018RainपाऊसTrafficवाहतूक कोंडी