शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : तिजोरीच्या ड्रॉव्हरसह ३० तोळे सोन्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 16:59 IST

शिवथर येथील निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात घुसून चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री घरफोडी केली. दरम्यान, तिजोरीचे कुलूप तुटत नसल्याने चोरट्यांनी ड्रॉव्हरच कापले. त्या ड्रॉव्हरसह त्यामध्ये असलेल्या तब्बल ३० तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी श्वानपथकासह घटनास्थळी धाव घेतली.

ठळक मुद्दे तिजोरीच्या ड्रॉव्हरसह ३० तोळे सोन्याची चोरीशिवथर येथे निवृत्त अधिकाऱ्याचे घर फोडले, पोलिसांची घटनास्थळी धाव

सातारा : शिवथर येथील निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात घुसून चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री घरफोडी केली. दरम्यान, तिजोरीचे कुलूप तुटत नसल्याने चोरट्यांनी ड्रॉव्हरच कापले. त्या ड्रॉव्हरसह त्यामध्ये असलेल्या तब्बल ३० तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी श्वानपथकासह घटनास्थळी धाव घेतली.याबाबत माहिती अशी की, टेलिफोन एक्सचेंजमधून निवृत्त अधिकारी जयवंत महादेव साबळे (वय ६१, रा. शिवथर, ता. सातारा) यांच्यासह घरातील सर्वजण रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर झोपी गेले. दुमजली इमारतीच्या एका खोलीत त्यांची तिजोरी होती. त्या खोलीत कोणीही नव्हते. या खोलीला फक्त कडी लावली होती.

मध्यरात्री पावसामुळे परिसरातील वीज गेली होती. दरम्यान, चोरट्यांनी कडी उघडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी तिजोरी उघडून त्यातील ड्रॉव्हर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ड्रॉव्हर लॉक असल्याने तो उघडता येत नसल्याने चोरट्यांनी तो ड्रॉव्हरच कापून त्याची चोरी केली. त्यामध्ये त्यामध्ये सोन्याचे गंठण, मोहनमाळ, अंगठ्या, सोन्याची चेन, फुले असा लाखो रुपयांचा ऐवज होता.

अंदाजे ६ लाख रुपये किमतीच्या मुद्देमालाची चोरी झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. खंडेराव धरणे, पोलीस निरीक्षक पी. डी. जाधव यांच्यासह श्वानपथकाने तपास करण्यास सुरुवात केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा