शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Satara: सोन्याच्या लिलावात गुंतवणुकीच्या आमिषाने २ कोटी २७ लाखांना गंडा, साताऱ्यातील घटना 

By दत्ता यादव | Updated: July 21, 2024 20:58 IST

Satara News: सोन्याच्या लिलावामध्ये खरेदी-विक्रीत गुंतवणूक करण्यास सांगून एकाची तब्बल २ कोटी २७ लाख ९५ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

- दत्ता यादव

सातारा - सोन्याच्या लिलावामध्ये खरेदी-विक्रीत गुंतवणूक करण्यास सांगून एकाची तब्बल २ कोटी २७ लाख ९५ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश पाटील, सचिन जाधव (रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली), मयूर मारुती फडके (रा. जुना वारजे, कर्वेनगर, पुणे), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

संतोष गुलाबराव शिंदे (वय ४७, मूळ रा. पाटखळ, ता. सातारा. सध्या रा. स्‍वरूप कॉलनी, सातारा) यांचे वरील तिघे संशयित मित्र आहेत. यातील मयूर फडके हा सोन्याच्या लिलावामध्ये खरेदी-विक्री करत होता. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्यांचा विश्वास संपादन करून मयूर फडके याच्याकडे पैसे गुंतविण्यास सांगितले. यानंतर संतोष शिंदे यांनी २८ एप्रिल २०२३ ते ९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत तिघा संशयितांकडे शिंदे यांनी आटीजीएस तसेच कॅश स्वरूपात एकूण २ कोटी २७ लाख ९५ हजार रुपये दिले.

मात्र, ना त्यांना सोने मिळाले ना त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संतोष शिंदे यांनी तिघा मित्रांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात दि. २० रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे हे अधिक तपास करीत आहेत.    

टॅग्स :GoldसोनंfraudधोकेबाजीSatara areaसातारा परिसर