शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: साताऱ्याच्या १९०५ च्या संमेलनामुळे पडला दरवर्षीचा पायंडा !

By नितीन काळेल | Updated: June 9, 2025 13:44 IST

तिसऱ्या संमेलनापासून वारसा : जिल्ह्यातील ७ वा साहित्य सोहळा

नितीन काळेलसातारा : सातारा जिल्ह्याला १६ व्या, १७ व्या शतकापासून साहित्याची मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नामांकित साहित्यिक होऊन गेले आहेत, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनातही साताऱ्याने नेहमीच पुढाकार घेतला आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या ९९ व्या संमेलनाचा मानही साताऱ्याला मिळालेला आहे. त्यामुळे सातारा शहरातील हे चाैथे, तर जिल्ह्यातील ७ वे संमेलन ठरणार आहे. विशेष म्हणजे १९०५ ला साताऱ्यात अखिल भारतीयचे तिसरे संमेलन झाले. त्यानंतरच दरवर्षीच संमेलने पार पडू लागली.सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व आहे, तसेच जिल्हा साहित्यिकांचाही आहे. या भूमीतूनच अनेक नामांकित साहित्यिक घडले, तसेच त्यांनी साहित्यातून विचारांची पेरणीही केली. त्यामुळे जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने अधिक संख्येने होत आहेत. यासाठी सातारकरांनी घेतलेला पुढाकार वाखाणण्यासारखाच आहे.

कारण, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात या साहित्य संमेलनांना सुरुवात झाली. १८७८ आणि १८८५ मध्ये पुण्यात संमेलने पार पडली. त्यानंतर १९०५ मध्ये तिसरे साहित्य संमेलन साताऱ्यात झाले. जिल्ह्यातील हे पहिले संमेलन ठरले; पण यानंतरच दरवर्षी साहित्य संमेलन घेण्याचा पायंडा पडला. १९०५ च्या संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात वकील रघुनाथ पांडुरंग तथा दादासाहेब करंदीकर होते. ते लोकमान्य टिळक यांचे जवळचे सहकारी होते. यानंतर तब्बल ५७ वर्षांनी १९६२ मध्ये साताऱ्यात ४४ वे संमेलन झाले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि साहित्यिक नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ अध्यक्ष होते. जिल्ह्यातील हे दुसरे संमेलन ठरले.१९६२ नंतर १३ वर्षांनी १९७५ मध्ये कऱ्हाडमध्ये ५१ वे साहित्य संमेलन झाले. जिल्ह्यातील तिसरे संमेलन होते. प्रख्यात साहित्यिका दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष त्यावेळचे केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण होते. देशातील आणीबाणीच्या काळात संमेलन झाल्याने जोरदार चर्चा झाली होती. यानंतर जिल्ह्यात साहित्य संमेलन होण्यासाठी १८ वर्षे वाट पाहावी लागली.१९९३ मध्ये ६६ वे संमेलन झाले. सातारा शहरातील तिसरे, तर जिल्ह्यातील चाैथे संमेलन होते. ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक विद्याधर गोखले संमेलनाचे अध्यक्ष, तर मंत्री अभयसिंहराजे भोसले हे स्वागताध्यक्ष होते. यानंतर १० वर्षांनी २००३ मध्ये कऱ्हाडमध्ये ७६ वे आणि जिल्ह्यातील पाचवे संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुभाष भेंडे होते. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे संमेलनाचे उद्घाटक होते.

महाबळेश्वरचे साहित्य संमेलन अध्यक्षाविना..२००९ मध्ये सातारा आणि कऱ्हाडनंतर जिल्ह्यातीलच महाबळेश्वरमध्ये प्रथमच संमेलन झाले. हे ऐकून ८२ वे संमेलन होते. जिल्ह्यातील सहावे ठरले. अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव होते; पण त्यांच्या एका पुस्तकामुळे वाद वाढला होता. त्यामुळे यादव यांनी अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले. अध्यक्षाविना संमेलन पार पडले. यानंतर जिल्ह्यात १६ वर्षांनी संमेलन होत आहे. हे जिल्ह्यातील ७ वे आणि साताऱ्यातील चाैथे संमेलन ठरणार आहे.

१७ अध्यक्ष सातारा जिल्ह्यातील..अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आतापर्यंत ९८ पार पडली आहेत. यामध्ये १७ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे सातारा जिल्ह्याने (विभागणीपूर्वीचाही जिल्हा धरून) भूषविले आहे. ही जिल्ह्यासाठी भूषणावह बाब आहे.

साताऱ्यातील संमेलन आदर्शवत ठरेल..साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साताऱ्यात संमेलन व्हावे या उद्देशानेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेची स्थापना करण्यात आली होती. गेली १२ वर्षे सतत साताऱ्यात संमेलन होण्यासाठी मागणी करत होतो. अखेर महामंडळाने मागणी मान्य केली. सातारा शहराला ३२ वर्षांनंतर पुन्हा संमेलन मिळवून देण्यात योगदान देऊ शकलो याचा अत्यंत आनंद आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सातारकरांच्या पाठबळावर राज्यात नाही तर देशात आदर्शवत ठरेल, असे संमेलन पार पाडून दाखवू. - विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ