शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

हद्दच झाली ! चोरट्यांनी केले नियोजन, फोडली चक्क पेट्रोल-डिझेलची पाईप लाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 19:42 IST

Petrol Pipeline Satara- मुंबई -पुणे -सोलापूरला जाणाऱ्या पेट्रोल - डिझेल पाईप लाईन मधून पेट्रोल चोरीचा प्रयत्न करताना लाईन फुटल्याने सासवड परिसरातील शेतं आणि विहिरी या पेट्रोल डिझेलने भरून गेल्या आहेत. ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे त्याठिकाणी चक्क पेट्रोल - डिझेलचे झरे वाहू लागले आहेत. त्यामुळे पाणी दुषित होऊन पिके जळाली असून मासे, बेडूक, साप मृत्यूमुखी पडले आहेत. याबाबत लोणंद पोलीसात पेट्रोल कंपनीने तक्रार दाखल केली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देचोरट्यांनी केले नियोजन, फोडली चक्क पेट्रोल-डिझेलची पाईप लाईनअज्ञातांवर गुन्हा दाखल, सासवडच्या विहिरी चक्क पेट्रोल डिझेलने भरल्या

आदर्की : मुंबई -पुणे -सोलापूरला जाणाऱ्या पेट्रोल - डिझेल पाईप लाईन मधून पेट्रोल चोरीचा प्रयत्न करताना लाईन फुटल्याने सासवड परिसरातील शेतं आणि विहिरी या पेट्रोल डिझेलने भरून गेल्या आहेत. ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे त्याठिकाणी चक्क पेट्रोल - डिझेलचे झरे वाहू लागले आहेत. त्यामुळे पाणी दुषित होऊन पिके जळाली असून मासे, बेडूक, साप मृत्यूमुखी पडले आहेत. याबाबत लोणंद पोलीसात पेट्रोल कंपनीने तक्रार दाखल केली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबई- पुणे -सोलापूर अशी एका कंपनीची उच्चदाब पेट्रोल पाईपलाईन जमिनीखालून सासवड ( झणझणे ) ता . फलटण गावच्या हद्दीतून गेली आहे. सासवड गावापासून दोन कि.मी अंतरावर खडकमाळ नावाच्या शिवारात पाईपलाईन मधून पेट्रोल मोठ्या प्रमाणात गळती होऊ लागल्याने संबधित कंपनीचे अधिकारी, लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी घटनास्थळास भेट दिली.

त्यावेळी चोरट्यांनी नियोजनबद्धरित्या पाईपलाईन फोडल्याचे निदर्शनास आले. शेतातील ऊसाच्या सऱ्या,ज्वारीचे वाफे यामध्ये लाखो लिटर पेट्रोल साठून राहिल्याने ज्वारी, मका, ऊस , गवत करपून गेले आहे. संबधीत कंपनीने टँकरद्वारे पेट्रोल भरून नेण्यात सुरूवात केली आहे. घटनास्थळापासून १ किमी परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी येण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला असून घटनास्थळी अग्नीशमक दलाची गाडी उभी करण्यात आली आहे. एका विहिरीतून पाणी मिश्रीत पेट्रोल टँकर भरण्याचे काम सुरू आहे.विहिरीत चार इंच पेट्रोलचा थर आल्याने परिसरात पाणी दुषित झाले आहे. त्यामुळे शेतकरी व जनावरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.तीन दिवसांपासून सुरु आहे गळतीसासवड परिसरात पेट्रोलची दुर्गधी येत असून शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. संबधित कंपनीने पेट्रोल पाईप लाईन तातडीने बंद केली. पंरतू पाईपलाईन मधील पेट्रोलची तीन दिवस गळती सुरु होती. हे पेट्रोल कंपनीने टँकरव्दारे भरून नेण्याचे काम दोन दिवसांपासून सुरु आहे. विहीरीत उतरलेले पेट्रोल टँकरमध्ये भरण्याचे काम आजही सुरू आहे. हजारो लिटर पेट्रोल वाया गेल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

शेतात पेट्रोल पसरल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पेट्रोल विहिरीत पाझरून पाणी दूषित झाल्याने पिण्यासाठी गावातून पाणी आणावे लागत आहे. त्याबरोबरच शेतीचेही मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा आहे.- रंजना लोंखडेसासवड (झणझणे ) ता . फलटण

टॅग्स :Petrolपेट्रोलSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस