सासवडच्या विहिरी चक्क पेट्रोल डिझेलने भरल्या, अज्ञातांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 07:09 PM2021-03-04T19:09:40+5:302021-03-04T19:11:49+5:30

Petrol sataranews- मुंबई -पुणे -सोलापूरला जाणाऱ्या पेट्रोल - डिझेल पाईप लाईन मधून पेट्रोल चोरीचा प्रयत्न करताना लाईन फुटल्याने सासवड परिसरातील शेतं आणि विहिरी या पेट्रोल डिझेलने भरून गेल्या आहेत. ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे त्याठिकाणी चक्क पेट्रोल - डिझेलचे झरे वाहू लागले आहेत. त्यामुळे पाणी दुषित होऊन पिके जळाली असून मासे, बेडूक, साप मृत्यूमुखी पडले आहेत. याबाबत लोणंद पोलीसात पेट्रोल कंपनीने तक्रार दाखल केली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Saswad's wells were filled with chucky petrol and diesel | सासवडच्या विहिरी चक्क पेट्रोल डिझेलने भरल्या, अज्ञातांवर गुन्हा दाखल

सासवडच्या विहिरी चक्क पेट्रोल डिझेलने भरल्या, अज्ञातांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देसासवडच्या विहिरी चक्क पेट्रोल डिझेलने भरल्याइंधनाच्या वाढत्या महागाईमुळे चोरट्यांनी नियोजबद्धरित्या फोडली पाईप लाईन

आदर्की : मुंबई -पुणे -सोलापूरला जाणाऱ्या पेट्रोल - डिझेल पाईप लाईन मधून पेट्रोल चोरीचा प्रयत्न करताना लाईन फुटल्याने सासवड परिसरातील शेतं आणि विहिरी या पेट्रोल डिझेलने भरून गेल्या आहेत. ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे त्याठिकाणी चक्क पेट्रोल - डिझेलचे झरे वाहू लागले आहेत. त्यामुळे पाणी दुषित होऊन पिके जळाली असून मासे, बेडूक, साप मृत्यूमुखी पडले आहेत. याबाबत लोणंद पोलीसात पेट्रोल कंपनीने तक्रार दाखल केली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई- पुणे -सोलापूर अशी एका कंपनीची उच्चदाब पेट्रोल पाईपलाईन जमिनीखालून सासवड ( झणझणे ) ता . फलटण गावच्या हद्दीतून गेली आहे. सासवड गावापासून दोन कि.मी अंतरावर खडकमाळ नावाच्या शिवारात पाईपलाईन मधून पेट्रोल मोठ्या प्रमाणात गळती होऊ लागल्याने संबधित कंपनीचे अधिकारी, लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी घटनास्थळास भेट दिली. त्यावेळी चोरट्यांनी नियोजनबद्धरित्या पाईपलाईन फोडल्याचे निदर्शनास आले.

शेतातील ऊसाच्या सऱ्या,ज्वारीचे वाफे यामध्ये लाखो लिटर पेट्रोल साठून राहिल्याने ज्वारी, मका, ऊस , गवत करपून गेले आहे. संबधीत कंपनीने टँकरद्वारे पेट्रोल भरून नेण्यात सुरूवात केली आहे. घटनास्थळापासून १ किमी परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी येण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला असून घटनास्थळी अग्नीशमक दलाची गाडी उभी करण्यात आली आहे. एका विहिरीतून पाणी मिश्रीत पेट्रोल टँकर भरण्याचे काम सुरू आहे. विहिरीत चार इंच पेट्रोलचा थर आल्याने परिसरात पाणी दुषित झाले आहे. त्यामुळे शेतकरी व जनावरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

तीन दिवसांपासून सुरु आहे गळती

सासवड परिसरात पेट्रोलची दुर्गधी येत असून शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. संबधित कंपनीने पेट्रोल पाईप लाईन तातडीने बंद केली. पंरतू पाईपलाईन मधील पेट्रोलची तीन दिवस गळती सुरु होती. हे पेट्रोल कंपनीने टँकरव्दारे भरून नेण्याचे काम दोन दिवसांपासून सुरु आहे. विहीरीत उतरलेले पेट्रोल टँकरमध्ये भरण्याचे काम आजही सुरू आहे. हजारो लिटर पेट्रोल वाया गेल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Web Title: Saswad's wells were filled with chucky petrol and diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.