Santosh Poole committed three murders in front of me | संतोष पोळने माझ्यासमोर तीन खून केले, ज्योती मांढरे हिची न्यायालयात साक्ष

संतोष पोळने माझ्यासमोर तीन खून केले, ज्योती मांढरे हिची न्यायालयात साक्ष

ठळक मुद्देमाफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिची न्यायालयात साक्षआज पुन्हा सुनावणी होणार

सातारा : वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने गुरुवारी सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी संतोष पोळ याने माझ्यासमोर तीन खून केले असून त्यापूर्वी त्याने एकट्याने तीन खून केले असल्याचे सांगितले आहे, अशी साक्ष माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने न्यायालया दिली. दरम्यान, पोळ याच्याशी मंदिरात लग्न केले असल्याचेही तिने यावेळी सांगितले.

संपूर्ण जिल्ह्याला, महाराष्ट्राला व देशाला हादरवणाऱ्या वाई-धोम हत्यांकाड खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन.एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम सरकार पक्षातर्फे काम पाहत असून गुरुवारी ते न्यायालयात उपस्थित होते.

वाई हत्याकांड प्रकरणात अनेक घडामोडीनंतर गुरुवारी या खटल्यातील महत्वाची माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिच्या साक्षीला सुरवात झाली. साक्ष देताना ज्योती म्हणाली, वाई येथील डॉ. घोटवडेकर यांच्या दवाखान्यात मी काम करत असताना २०१३ मध्ये तिची संतोष पोळ याच्याशी ओळख झाली.

१३ आक्टोबर २०१३ रोजी दोघांनी वाईतील गायत्री मंदीरात लग्न केले. त्यानंतर सहा महिन्यात काम सोडून नर्सिंग कोर्ससाठी प्रवेश घेतला. तीन वर्षांनी प्रशिक्षण पूर्ण झाले. लेखी परीक्षाही दिली. दरम्यान, तीन सिमकार्ड वापरून डॉॅ.संतोष पोळ याच्या संपर्कात असल्याची माहिती तिने दिली.

ज्योती मांढरे पुढे म्हणाली, मार्च २०१५ मध्ये मला हॉस्पिटलमधून कामावरून काढून टाकल्याने पैशाची चणचण भासू लागली. संतोष पोळ याला भाड्याने अ‍ॅम्बुलन्स चालवायला दिली होती. परंतु, हप्ते न भरल्याने ती रुग्णवाहिका परत घेतली.

यामुळे नोव्हेंबर २०१५ मध्ये तुम्ही प्रॅक्टीस सुरू करा, असे तिने संतोष पोळ याला सांगताच त्याने माझी डीग्री खोटी आहे, रजिस्ट्रेशन झाले नाही, असे त्याने उत्तर दिले. ते ऐकूण ज्योती मांढरेला धक्का बसला. याचवेळी डॉ.पोळ याने ज्योती मांढरे हिला एक प्लॅन आहे, असे सांगितले.

लोक मला डॉक्टर समजतात. मी तपासणीच्या बहाण्याने त्यांना बोलवतो आपण त्यांना मारून दागिणे लूटू, असे तो म्हणाला. यावेळी मांढरे हिने आपण पकडले जाणार असे सांगितले. यावर संतोष पोळ म्हणाला, यापूर्वी मी सुरेखा चिकणे, वनिता गायकवाड व जगाबाई पोळ यांचा खून केला आहे.

ज्योतीने त्यांना  कसे मारतो, मृतदेहाचे काय करतो याबाबत विचारणा केली. त्यावेळी इंजेक्शन द्यायचे, त्यातून तो नैसर्गीक मृत्यू आल्यासारखे वाटते, कोणाला संशय येत नाही, असे त्याने सांगितले.

याच माध्यमातून पुढे डॉ.संतोष पोळ याने नथमल, सलमा व मंगल जेधे यांचे खून केल्याची साक्षही ज्योती मांढरे हीने न्यायालयासमोर दिली. अद्याप ज्योतीची साक्ष पूर्ण होऊ शकली नाही. यामुळे शुक्रवारी पुन्हा याप्रकणी सुनावणी होणार आहे.

 

Web Title: Santosh Poole committed three murders in front of me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.