राज्यातील काव्य स्पर्धेत संतोष महाजन प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:25 IST2021-06-29T04:25:49+5:302021-06-29T04:25:49+5:30

पिंपोडे बुद्रुक : उत्तर कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील कवी संतोष शिवलिंग महाजन या युवकाने सप्तरंगी कला ...

Santosh Mahajan first in the state poetry competition | राज्यातील काव्य स्पर्धेत संतोष महाजन प्रथम

राज्यातील काव्य स्पर्धेत संतोष महाजन प्रथम

पिंपोडे बुद्रुक : उत्तर कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील कवी संतोष शिवलिंग महाजन या युवकाने सप्तरंगी कला अविष्कार व हेल्पिंग हँड्स फाऊंडेशन, सोलापूरतर्फे ‘आम्ही भारतीय’ या विषयावर काव्य लेखन स्पर्धेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवून सातारा जिल्ह्याची मान उंचावली आहे.

याबाबत माहिती अशी की, आम्ही भारतीय या विषयावर ऑनलाईन कवी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील ४८ कवींनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये संतोष महाजन यांनी काव्यलेखन स्पर्धेमध्ये प्रत्येक लेखकाला आपल्या देशाचा गर्व असावा, या लेखन कवितेला राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला. राज्याचे स्पर्धक नियोजक महादेव दिवटे, मोहउद्दीन नदाफ, शुभम पाटील या राज्याचे काव्यलेखन परीक्षेचे परीक्षक समाधान पारधी, अनिल शिंदे यांनी केले होते. त्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट कवी लेखन केल्याने त्यांचा राज्यामध्ये प्रथम क्रमांक आला.

या निवडीबद्दल व्यापारी संघटना पिंपोडे बुद्रुक, ग्रामपंचायत पिंपोडे बुद्रुक, उत्तर कोरेगाव तालुका पत्रकार संघ, माननीय रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, कोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, दिगंबर आगवणे यांनी महाजन यांचे कौतुक केले.

Web Title: Santosh Mahajan first in the state poetry competition