शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत मग सरोगेट मदर बेबी, राजेश क्षीरसागर यांचा घणाघात 

By दीपक शिंदे | Updated: March 13, 2023 19:26 IST

खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील ५० आमदार टेस्टट्यूब बेबी असल्याची टीका केली होती

सातारा : ‘राजकारणात टीका करताना मर्यादा पाळाव्या लागतात. पण, खासदार संजय राऊत ज्येष्ठ असूनही काहीतरी बोलत सुटतात. त्यांना लोकं कंटाळलेत. त्यांनी आमच्या ५० आमदारांवर टेस्टट्यूब बेबीची टीका केली. त्यांनीच राऊतांना मतदान केले होते. मग राऊत सरोगेट मदर बेबी ठरले,’ असा घणाघात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केला.सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सातारा लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानंतर प्रथमच ते साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेची (शिंदे गट) बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव उपस्थित होते.राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राज्यात शिवसेनेची बांधणी सुरू आहे. विधानसभा, लोकसभा मतदारसंघनिहाय संपर्कप्रमुखपदाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सातारा लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच साताऱ्यात आलो. या ठिकाणचे शिवसेनेचे चित्र चांगले दिसून आले. येथे पक्षाची भक्कम बांधणी झाली आहे. जिल्ह्यात आठपैकी दोन आमदार पक्षाचे आहेत. आगामी काळात सातारा जिल्हा हा शिवसेनेचाच होईल, असा विश्वास आहे.राज्य शासन विकासाच्या दिशेने जात आहे. सातारा जिल्ह्यातील नियोजन समितीचा निधी लॅप्स होणार नाही. अजून काही दिवस आहेत. साताऱ्याचे पालकमंत्री निधी खर्चासाठी सक्षम आहेत. त्यामुळे मार्चअखेर निधी कामावर खर्च होईल, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. याचबरोबर त्यांनी सातारा लाेकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार मला नाही. पण, निवडणुकीत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, हे पाहू असा विश्वासही पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

सातारा लोकसभेसाठी सक्षम उमेदवार...पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष व आ. जयकुमार गोरे यांनी राज्याचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतीत, असे वक्तव्य केल्याचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर क्षीरसागर यांनी आता मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत आणि पुढचेही म्हणून मी त्यांच्याकडेच पाहतो, असे उत्तर दिले, तर सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपने तयारी केल्याच्या प्रश्नावर त्यांनी पूर्वी भाजप-सेनेत कटशहाचे राजकारण होते. पण, आता तसे नाही. आता बरोबर आहोत. जागा वाटपाचा प्रश्न हा निवडणुकीपूर्वी असतो. त्यावेळी काय ते ठरेल. पण सातारा मतदारसंघात शिवसेना सक्षम उमेदवार देऊ शकते, असा दावाही केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSanjay Rautसंजय राऊतRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर