सांगली : स्वाभिमानीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक नोटांची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 16:35 IST2018-12-14T15:56:12+5:302018-12-14T16:35:14+5:30
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी, शेतकऱ्यांना बिले दिली नाहीत. या घटनेच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिकात्मक नोटा उधळून शासनाचा निषेध केला.

सांगली : स्वाभिमानीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक नोटांची उधळण
सांगली : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी, शेतकऱ्यांना बिले दिली नाहीत. या घटनेच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिकात्मक नोटा उधळून शासनाचा निषेध केला.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, उपाध्यक्ष महावीर पाटील, जयकुमार कोले, संदीप चौगुले, सनी गडगे, संजय खोलखुंबे आदी उपस्थित होते.
कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसात ऊस उत्पादकांना ऊसबिल देणे कायद्याने बंधनकारक आहे.
कारखान्यांनी दीड महिन्यात शेतकऱ्यांना बिले दिली नाहीत. याकडे प्रशासनही गांभीर्याने लक्ष देत नाही. याच्या निषेधार्थ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिकात्मक नोटांची उधळण केली.