शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कराडात ऊस दरासाठी संघर्ष समितीची पायी दिंडी, यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाला घातलं साकडे

By प्रमोद सुकरे | Updated: November 14, 2022 16:26 IST

'ऊसाला ३५०० रुपये दर मिळालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो' अशा प्रकारच्या घोषणा देऊन शेतकऱ्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला.

कराड : उसाला ३५०० रुपये भाव मिळाला पाहिजे; यासाठी सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून सोमवारी कराडात ऊस दर संघर्ष समिती च्या वतीने कोपर्डे ते कराड ६ किलोमीटर पायी दिंडी काढण्यात आली. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून साखर कारखानदारांना सुबुद्धी द्यावी असे साकडे घालण्यात आले.सोमवारी सकाळी कोपर्डै हवेली (ता. कराड) येथील सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेत शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात पायी दिंडीला सुरुवात केली. या दिंडीचे बनवडी फाटा, सैदापूर, गोवारे मंगळवारपेठ या ठिकाणी शेतकऱ्यांनी जंगी स्वागत केले. त्यानंतर ही दिंडी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर पोहोचली. तेथे समाधीला ऊस व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  साखर सम्राटांना सुबुद्धी द्यावी असे साकडे यावेळी घालण्यात आले.यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख, माजी मंत्री सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष सचिन नलावडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, विश्वास जाधव, बैलगाडा शर्यत संघटनेचे धनाजी शिंदे ,अपंग प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे , शिवाजी पाटील, शिवाजी डुबल,, रवी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.सातारा जिल्ह्यामधील कारखान्यांनी उसाची पहिली उचल ३५०० रुपये द्यावी यासाठी कोपर्डी हवेली येथे पहिली ऊस परिषद पार पडली होती. त्यावेळी ऊस परिषदेमध्ये आंदोलनाचे टप्पे शेतकऱ्यांनी ठरवले होते. त्यानुसार सोमवारी दि.१४ रोजी कोपर्डे हवेली येथील सिद्धनाथ देवाचे दर्शन घेऊन बनवडी फाटा, कृष्णा कॅनॉल, मंगळवार पेठ कराड ते यशवंतराव चव्हाण  समाधीस्थळ प्रीतीसंगम अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पायी दिंडी झाली.यावेळी शेतकऱ्यांनी 'ऊसाला ३५०० रुपये दर मिळालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो' अशा प्रकारच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला.सदाभाऊ खोत म्हणाले, दोन साखर कारखान्यामधील २५ किलोमीटरचे अंतर ही अट आता रद्द केली पाहिजे. साखर कारखानदारांची मक्तेदारी मोडीत काढली पाहिजे. जागोजागी साखर कारखाने सुरू झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळणार नाही. त्याचबरोबर सहकारी साखर कारखानदारच खाजगी साखर कारखाने उभारत असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत असे मत व्यक्त केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने