Sandeep Godse as the approved councilor of Vaduz | वडूजच्या स्वीकृत नगरसेवकपदी संदीप गोडसे
वडूजच्या स्वीकृत नगरसेवकपदी संदीप गोडसे

ठळक मुद्देवडूजच्या स्वीकृत नगरसेवकपदी संदीप गोडसेबिनविरोध निवड झाल्याचे जाहीर

वडूज : वडूज नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीचे संदीप किसनराव गोडसे यांची बिनविरोध निवड झाली.

स्वीकृत नगरसेवक अभय देशमुख यांनी राजीनामा दिल्याने झालेल्या रिक्त नगरसेवकपदासाठी पिठासन अधिकारी तथा जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी कार्यक्रम जाहीर केला होता.

मंगळवार, दि. १० रोजी पिठासन अधिकारी रवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीमध्ये विशेष बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीचे संदीप गोडसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. छाननीनंतर अर्ज वैध ठरविण्यात आला. पिठासन अधिकारी पवार यांनी संदीप गोडसे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

निवडीनंतर बोलताना गोडसे म्हणाले, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखाली वडूज शहरात विविध विकासकामे मार्गी लावून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहू. राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी अहोरात्र काम करणार आहे.

यावेळी पिठासन अधिकारी तथा जिल्हा प्रशासन अधिकारी रवी पवार, मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष सुनील गोडसे, उपनगराध्यक्षा किशोरी पाटील, सर्व नगरसेवक व नगरसेविका यांनी सत्कार केला.

 

Web Title: Sandeep Godse as the approved councilor of Vaduz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.