शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: पानवण फाटा येथे वाळूच्या डंपरने विद्यार्थ्यांना ठोकारले, तिघेजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 16:31 IST

अपघाताची माहिती देऊनही पोलीस, महसूलचे अधिकारी लवकर न आल्याने पानवण ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

म्हसवड : म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील पानवण फाटा येथे आज, सोमवारी सकाळी सातच्या सुमारास वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीवरून शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांना समोरून धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. समाधान राधाप्पा नरळे, शुभम दादासाहेब चव्हाण, सुधीर शामराव शिंदे अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

जखमीमधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे, अपघाताची माहिती देऊनही पोलीस, महसूलचे अधिकारी लवकर न आल्याने पानवण ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर तहसीलदारांच्या गाडीला ग्रामस्थांनी घेराव घातला.घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, पानवण येथील बारावीत शिकणारे समाधान राधाप्पा नरळे, शुभम दादासो चव्हाण, सुधीर शामराव शिंदे हे तिघे देवापूर येथील विद्यालयात शिकत आहेत. शाळेत जादा तास असल्याने ते नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घरातून दुचाकीवरून देवापूरला निघाले. त्यांची दुचाकी गंगोती फाट्याजवळ आली असता समोरुन वाळूने भरलेल्या भरधाव डंपरने (एमएच ११ एएल ४८४५) ने विद्यार्थ्यांच्या दुचाकी (एमएच ४२ एन ५२०१) त्यांना जोरात धडक दिली.या धडकेत तिन्ही मुले उडून बाजूला पडली. यामध्ये तीन ही विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी शुभम चव्हाण व सुधीर शिंदे यांना म्हसवड येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. तर समाधान नरळे यास पुढील उपचारार्थ प्रथम अकलूज येथे नेण्यात आले. मात्र, तेथे त्याची प्रकृती अधिक गंभीर बनल्याने त्याला तेथून पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची चौकशी करून संबंधित डंपर चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातStudentविद्यार्थी