शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक!, साताऱ्यात आठवीतील मुलीची साडेतीन हजारांत विक्री, लाॅजवर नेऊन केला बलात्कार

By दत्ता यादव | Updated: May 6, 2023 15:51 IST

घडलेल्या प्रकाराची माहिती मुलीने आईला मेसेज करून सांगितली. त्यावेळी तिची आई बाहेरगावी होती

सातारा : ऐतिहासिक वारसा असलेल्या सातारा शहराला हादरून सोडणारी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, आठवीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीची चक्क साडेतीन हजारांत विक्री करून एका महिलेने तिला अनोळखीच्या हवाली केले.त्या नराधमाने मुलीला साताऱ्यातील एका लाॅजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार तब्बल नऊ दिवसांनंतर उघडकीस आला असून, याप्रकरणी संबंधित महिला व अनोळखी पुरुषावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारती अमित कट्टीमणी (रा. कोडोली, सातारा) या महिलेस एका ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी १३ वर्षांची असून, ती आठवी इयत्तेत शिकत आहे. भारती कट्टीमणी हिने पीडित मुलीला २८ एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसात वाजता ‘बाहेरचे लोक येतायत. त्यांच्यासोबत फिरायला जायचे आहे,’ असे सांगितले. त्यामुळे मुलगी तिच्यासोबत फिरण्यासाठी गेली. त्यानंतर भारतीने तिला थेट साताऱ्यातील एका लाॅजवर नेले. या ठिकाणी अगोदरच तेथे एक अंदाजे ४० वर्षीय अनोळखी व्यक्ती होती. त्या व्यक्तीसोबत भारतीने व्यवहार ठरविला. त्या व्यक्तीकडून साडेतीन हजार रुपये घेऊन तिने मुलीची विक्री केली. त्याच्या ताब्यात मुलीला देऊन भारती तेथून निघून गेली. संबंधित नराधमाने त्या शाळकरी मुलीवर लाॅजच्या खोलीमध्ये बलात्कार केला. या प्रकारानंतर मुलगी रडू लागली. तेव्हा तिला दमदाटी करण्यात आली. घडलेल्या प्रकाराची माहिती मुलीने आईला मेसेज करून सांगितली. त्यावेळी तिची आई बाहेरगावी होती. मेसेज पाहिल्यानंतर आईने मुलीला तत्काळ फोन केला. तेव्हा मुलगी रडू लागली. घडलेला घृणास्पद प्रकार मुलीने रडत-रडतच तिच्या आईला सांगितला. त्यानंतर आईने तातडीने साताऱ्यात येऊन तिच्या वडिलांना या प्रकाराची माहिती दिली. मात्र, या प्रकाराची कोठे वाच्यता होऊ नये, यासाठी काहींचे प्रयत्न सुरू झाले. परंतु पीडित मुलीच्या आईने आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणाच्याही दबावाला बळी न पडता नऊ दिवसांनंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारती कट्टीमणी हिच्यासह त्या अनोळखी नराधमावर मुलीची विक्री करून जबरदस्तीने बलात्कार करणे, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम ३७२, ३७६, ३२३, ३४ आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस उपिनरीक्षक वाघमोडे हे अधिक तपास करीत आहेत.  

सीसीटीव्हीत ‘त्याचा’ चेहरा कैदसाताऱ्यासारख्या शांत शहरात अशा प्रकारची घृणास्पद घटना घडल्याने पोलिसांनीही याची तातडीने दखल घेतली. गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी दोन पथके विविध ठिकाणी रवाना केली. लाॅजमधील सीसीटीव्हीमध्ये संबंधित आरोपी नराधमाचा चेहरा कैद झाला असून, तो आणि भारती दोघेही पसार झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस