शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

मान्सून बरसला, बळीराजा आनंदला; सातारा जिल्ह्यात पेरण्यांची लगबग! 

By नितीन काळेल | Updated: June 11, 2024 19:23 IST

५ हजार क्विंटल बियाणे अन् २२ हजार मेट्रिक टन खताची विक्री 

सातारा : जिल्ह्यात मान्सून वेळेत सुरू झाला असून सर्वदूर पाऊस पडलेला आहे. यामुळे बळीराजांत आनंदाचे वातावरण असून पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. आतापर्यंत ५ हजार क्विंटल बियाणे आणि २२ हजार मेट्रिक टन खताची विक्री झालेली आहे, तसेच कृषी निविष्ठा दुकानातही पुरेसा साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास कृषी विभागाला आहे.जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वांत मोठा समजला जातो. दरवर्षी सर्वसाधारणपणे खरीप हंगामाचे ऊस वगळून क्षेत्र हे सुमारे पावणे तीन लाख हेक्टरवर असते. यावर्षीच्या खरिपासाठी २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर क्षेत्र राहील, असा अंदाज आहे. यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना खते आणि बियाणे मिळण्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे, तसेच शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही यादृष्टीने नियोजन झालेले आहे.खरीप हंगामात शेतकऱ्यांना प्रामुख्याने खते आणि बियाणे आवश्यक असतात. पाऊस वेळेत सुरू झाला तर पेरणीही उरकते; पण गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे पेरणी कमी झाली. यंदा खरिपावर दुष्काळाचे सावट होते, तरीही कृषी विभागासह शेतकरीही तयारीत होते. यावर्षी खरीप हंगामात जिल्ह्यासाठी ४४ हजार ७९५ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, भात, वाटाणा, घेवडा आदी बियाण्यांचा समावेश आहे.यातील ९ हजार ३६५ क्विंटल बियाणे हे महाबीज आणि एनएससीकडून मिळणे अपेक्षित आहे, तर ३५ हजार क्विंटल बियाणे हे खासगी क्षेत्रातून उपलब्ध होईल. सध्या जिल्ह्यातील बाजारपेठेत २८ हजार १६२ क्विंटल बियाणे उपलब्धही झाले आहे. त्यामुळे आता जरी पेरणी सुरू केली तरी शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत. त्याचबरोबर पिकांसाठी खतांची आवश्यकता राहते. यासाठी शासनाने खरीप हंगामाकरिता १ लाख ९ हजार ५०१ मेट्रिक टन खतसाठा मंजूर केलेला आहे. १ एप्रिलपासून ७० हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे, तर सुमारे २२ हजार मेट्रिक टन खताची विक्रीही झाली आहे.जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसाने पश्चिम भागात हजेरी लावली आहे. त्याचबरोबर दुष्काळी भागात वेळेवर पाऊस पडणार का अशी चिंता होती; पण मान्सूनने ही चिंताही दूर केली आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा अशा सर्वच तालुक्यात चांगला पाऊस पडलेला आहे, तसेच काही गावांतील ओढ्यांना पाणी आले असून बंधाऱ्यातही साठा झाला आहे. त्यामळे पेरणीसाठी उपयुक्त पाऊस झाला आहे. त्यातच खते आणि बियाणेही बाजारात उपलब्ध आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केल्यास कोणतीही अडचण येणार नाही.

१२ भरारी पथके करणार कारवाई..दरवर्षीच खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून भरारी पथके स्थापन केली जातात. ही पथके बोगस खते, बियाणेप्रकरणी कारवाई करतात. आताही कृषी विभागाने जिल्हास्तरावर एक आणि प्रत्येक तालुक्यात एक अशी मिळून १२ पथके स्थापन केली आहेत. त्यांचे लक्ष बोगस खते, बियाणे विक्री, भेसळ यावर असणार आहे.

जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पडू लागला आहे. अनेक भागांत चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात होणार आहे, तसेच कृषी विभागाच्या वतीनेही खरीप हंगामासाठी पुरेशी खते आणि बियाणे उपलब्ध आहेत. पेरणीदरम्यान शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी कृषी विभागाकडून पूर्णपणे नियोजन करण्यात आलेले आहे. - विजय माईनकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरी