शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

सोडली नोकरी बनला सनदी अधिकारी; उंडाळेच्या साईराज पाटील यांची यूपीएससीत ५४५ वी रँक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 13:08 IST

आयआयटी बॉम्बे येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. पदवी पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिसमध्ये नोकरीही केली.

प्रसाद पाटीलउंडाळे : येथील साईराज पंडितराव पाटील यांनी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत ऑल इंडिया ५४५ वी रँक मिळवली आहे. ग्रामीण भागातून मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात असून त्यांच्या या यशाबद्दल काैतुक हाेत आहे.साईराज पाटील यांचे वडील पंडितराव दिनकर पाटील हे सध्या पाटण येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत, तर आई जयश्री पंडितराव पाटील या माध्यमिक शिक्षिका आहेत. साईराज यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण त्यांनी पुणे येथे पूर्ण केले. पुढे त्यांनी आयआयटी बॉम्बे येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. पदवी पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिसमध्ये नोकरीही केली. मात्र प्रशासनात जाऊन समाजासाठी काम करण्याची इच्छा असल्यामुळे २०२१ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन यूपीएससीची तयारी सुरू केली. २०२४ व २०२५ या दोन्ही वर्षांत त्यांनी मेन्स परीक्षा दिली होती. यंदाच्या चौथ्या प्रयत्नात त्यांना हे यश मिळाले.

रोज सातत्याने सहा ते आठ तास अभ्यास करण्यावर त्यांनी भर दिला. प्रिलिम्सपूर्वी ऑप्शनल विषय पूर्ण केला. त्यानंतर विविध टेस्ट सिरीज दिल्या. मित्रांबरोबर चर्चा केल्या तसेच कॉलेजमधील सीनियर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन घेतले. या सर्व गोष्टींचा तयारीत मोठा फायदा झाला. या प्रवासात आई-वडील तसेच बहिणींनेही माेठा पाठिंबा दिला. -साईराज पाटील 

आमच्या गावातील माजी जिल्हाधिकारी दिवंगत दिनकरराव पाटील यांच्या प्रेरणेने मुलाला प्रशासनात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. आज मुलाने यूपीएससीत यश मिळवून आमचे स्वप्न पूर्ण केले. आमची दोन्ही मुले समाजासाठी काम करतील याचे आम्हाला समाधान वाटते. - पंडितराव पाटील, वडील, नायब तहसीलदार पाटण

English
हिंदी सारांश
Web Title : From Job to IAS: Undale's Sairaj Patil Secures UPSC Rank

Web Summary : Sairaj Patil from Undale achieved 545th rank in UPSC 2025, after leaving his job at the Ministry of Social Justice. With a civil engineering degree from IIT Bombay, he dedicated himself to UPSC preparation, fulfilling his dream of serving society.