शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

‘सह्याद्री’ झालं, ‘कृष्णा’कडे लक्ष ; लढत दुरंगी की तिरंगी; सभासदांमध्ये तर्कवितर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 18:21 IST

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली अन् क-हाड उत्तरचे आमदार व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील सहकारमंत्री झाले. त्यामुळे त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी गारठले. मनोज घोरपडेंनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला.

ठळक मुद्देनिवडणुकीचा बिगुल वाजणार

प्रमोद सुकरे ।क-हाड : गत महिन्यात कºहाड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा कारखाना बिनविरोध झाल्याने त्यांची राज्यात आणखी पत वाढली. पण तालुक्यातील तितक्याच मोठ्या ‘कृष्णा’ कारखान्याचं इलेक्शन काही महिन्यांत होणार आहे. कृष्णेची निवडणूक बिनविरोध होण्याची सूतराम शक्यता नाही; पण लढत दुरंगी की तिरंगी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली अन् क-हाड उत्तरचे आमदार व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील सहकारमंत्री झाले. त्यामुळे त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी गारठले. मनोज घोरपडेंनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. तर धैर्यशील कदमांनी मौनच ठेवले. त्यामुळे बाळासाहेबांचा बिनविरोधचा मार्ग सुकर झाला. त्यांच्या इच्छुकांनी डोकेदुखी वाढविली. पण त्यावर त्यांनी गोड उपायही काढला. अन् बाळासाहेब ‘हिरो’ ठरले.

आता तालुक्यातील ‘कृष्णा’ कारखान्याची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमके काय होणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. पण ‘सह्याद्री’प्रमाणे ‘कृष्णा’ची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता सूतराम नाही. पण यात कोणाकोणाची किती पॅनेल रिंगणात असणार, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

सध्या ‘कृष्णा’त डॉ. सुरेश भोसले यांची सत्ता आहे. भोसले परिवार भाजपवासी झाल्याने ते अनेकांच्या पचनी पडलेले नाही. त्यामुळे कारखाना भाजपच्या ताब्यात आहे. अन् तो त्यांच्या ताब्यात ठेवायचा नाही, असा प्रचार करून विरोधक सत्तांतरासाठी चाल खेळत आहेत. त्यात माजी अध्यक्ष, राष्ट्रवादीचे नेते अविनाश मोहिते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समर्थक डॉ. इंद्रजित मोहिते यांचा समावेश आहे.

कृष्णेच्या फडात उतरण्याची तयारी डॉ. सुरेश भोसले, डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते या तिघांनीही चालविली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत कृष्णेची निवडणूक गतवेळेप्रमाणे तिरंगीच होणार असे चित्र एका बाजूला दिसत आहे. तर दुसºया बाजूला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने, मुंबई बाजार समिती निवडणुकीप्रमाणे कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचे पॅनेल, असा प्रयोग होऊ शकतो का? याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. सभासद शेतकरी त्याबाबत तर्कवितर्क लढवित असून, नेमके काय घडणार? हे पाण्यासाठी सर्वांनाच थोडे थांबावे लागणार आहे.

राजकारणात काहीही घडू शकतेभोसलेंना रोखण्यासाठी डॉक्टर व इंजिनिअर मोहिते एकत्र येणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, अविनाश मोहिते यांनी अनेक सभांमधून मी कोनाशी जुळवून घेणार या अफवा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका, असे सांगितले आहे. तर डॉ. इंद्रजित मोहिते यांनीही मी एकतर्फी प्रेम करणारा माणूस नाही. मी यशवंतराव मोहिते यांच्या नावाने पॅनेल उभे करणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही मोहिते एकत्र येण्याची शक्यता धुसर वाटत असली तरी ‘राजकारणात काहीही घडू शकते,’ हेही तितकेच खरे आहे बरं !

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण