मानेगावच्या पुलावरील ‘एस’ वळण ठरतेय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:39 IST2021-04-01T04:39:52+5:302021-04-01T04:39:52+5:30

सणबूर : ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील मानेगावच्या पुलावरील ‘एस’ आकाराचे वळण अतिशय धोकादायक आहे. वारंवार तिथे ...

The 'S' turn on the Manegaon bridge is dangerous | मानेगावच्या पुलावरील ‘एस’ वळण ठरतेय धोकादायक

मानेगावच्या पुलावरील ‘एस’ वळण ठरतेय धोकादायक

सणबूर : ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील मानेगावच्या पुलावरील ‘एस’ आकाराचे वळण अतिशय धोकादायक आहे. वारंवार तिथे अपघात होत असले तरी उपाययोजना मात्र शून्यच असल्याने संबंधित विभागाचे डोळे उघडणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.

ढेबेवाडी ते कऱ्हाड या २७ किलोमीटरच्या मार्गावर वाहनांची रात्रं-दिवस वर्दळ असते. अलीकडच्या काळात त्याचे मानेगावपर्यंत चौपदरीकरण आणि तेथून पुढे रुंदीकरण झाले आहे. रस्ता विस्तारल्यामुळे वाहन चालकही सुसाट झाल्याने ओघानेच अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावरील काही वळणे पूर्वीपासूनच अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. चौपदरीकरणानंतरही त्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. त्यामध्ये मानेगावच्या पुलानजीकच असलेल्या वळणाचा प्रामुख्याने समावेश आहे. रस्त्याच्या चौपदरीकरण आणि रुंदीकरणावेळी संबंधितांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्याने या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. दोन्ही बाजूकडून येणाऱ्या वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने गोंधळ उडत आहे. वेग नियंत्रणासाठी वळणाच्या दोन्ही बाजूला झेब्रा क्राॅसिंग करणे गरजेचे आहे. तरच अपघातावर नियंत्रण मिळविता येईल. मात्र, बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाबाबत वाहनचालक प्रवासी व जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

(चौकट)

सर्वच वळणांचा सर्व्हे करा..

मानेगावजवळचे धोकादायक वळण केवळ अपघातच घडल्यानंतर चर्चेत येते. संबंधित विभाग ठोस उपाययोजनांसाठी पावले उचलत नसल्याने मूळ समस्या कायम आहे. या मार्गावरील सर्वच वळणांचा सर्व्हे करून आवश्यक उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे.

३१सणबूर

ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील मानेगावच्या पुलावरील ‘एस’ आकाराचे वळण अतिशय धोकादायक ठरत आहे.

Web Title: The 'S' turn on the Manegaon bridge is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.