एस. टी. सुरक्षित तरी मुंबईकरांची ट्रॅव्हल्सला प्रसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:40 IST2021-07-27T04:40:05+5:302021-07-27T04:40:05+5:30

सातारा : राज्य परिवहन महामंडळाचा प्रवास सर्वात सुरक्षित मानला जातो. तरीही काहीजणांची खासगी प्रवासी बसला पसंती मिळत आहे. त्याचे ...

S. T. Safe but Mumbaikars love travels | एस. टी. सुरक्षित तरी मुंबईकरांची ट्रॅव्हल्सला प्रसंती

एस. टी. सुरक्षित तरी मुंबईकरांची ट्रॅव्हल्सला प्रसंती

सातारा : राज्य परिवहन महामंडळाचा प्रवास सर्वात सुरक्षित मानला जातो. तरीही काहीजणांची खासगी प्रवासी बसला पसंती मिळत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. पाटण, खटाव तालुक्यांतील बहुतांश मंडळी माथाडी कामगार म्हणून मुंबईत राहतात. त्यांचा रोजचा संबंध येत असल्याने या गावांतून दररोज ट्रॅव्हल्स मुंबईला जाते. त्यामुळे थेट गावी पोहोचता येत असल्याने ट्रॅव्हल्सला पसंती मिळत आहे.

सातारा आणि पुणे, मुंबईचे जवळचे नाते आहे. पुणे काही अंतरावर असल्याने एस. टी.ला चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, मुंबईहून येणाऱ्यांकडून ट्रॅव्हल्सचा वापर केला जातो. मुंबई बाजार समितीत दिवसभर काम करुन रात्री जेवण करुन हे कामगार ट्रॅव्हल्समध्ये बसतात अन् सकाळी दिवस उगवताना आपापल्या गावी घरात जातात. हे त्यांच्यासाठी सोयीचे ठरते. पण ट्रॅव्हल्सचा वापर केवळ या मंडळींकडून होतो. इतर मंडळी मात्र एस. टी.ला पसंती देतात.

राज्य परिवहन महामंडळानेही विविध आगारांतून पुणे, मुंबई, बोरिवली याठिकाणी गाड्या सोडल्या आहेत. नोकरदार, उद्योजकांना याचा फायदा होतो. मात्र, एस. टी.च्या फेऱ्या अजूनही ग्रामीण भागात जात नाहीत. त्यामुळे सातारा किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पुन्हा खासगी वाहनाने आपापल्या गावी जावे लागते. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीकडे कल वाढत आहे.

चौकट

एस. टी.ला स्पीड लॉक; ट्रॅव्हल्स सुसाट

सातारा जिल्ह्यातून गेलेल्या पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे शेंद्रेपर्यंत सहापदरीकरण झाले आहे. त्यामुळे रस्ता रिकामा असतो. मात्र, तरीही एस. टी.च्या वेगावर प्रशासनाने मर्यादा घालून दिल्या आहेत. त्यामुळे चालकांनी कितीही पळविण्याचा प्रयत्न केला तरी त्या पळत नाहीत. याउलट खासगी प्रवासी वाहनांना वेगमर्यादा नसल्याने त्या सुसाट धावत आहेत. साहजिकच कमी वेळेत साताऱ्यात येतात. पण हीच बाब प्रवाशांच्या जीवावर बेतत असते.

तरुणांना सुरक्षेपेक्षा आराम महत्वाचा...!

राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी.चा प्रवास सुरक्षित आहे. हे खरं असलं तरी लांबचा प्रवास असल्यामुळे ताटून जातो. त्यापेक्षा खासगी प्रवासी बसने प्रवास करणे कधीही चांगले वाटते. छानपैकी झोपून प्रवास करता येतो.

- अजय पाटील, सातारा.

कोट

आता कोरोनानंतर अपघातांचे प्रमाण कमी झालेले असले तरी खासगी प्रवासी गाड्यांना अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे वेळ लागत असला तरी एस. टी.ने प्रवास करणे कधीही हिताचे असते. मुलांना एस. टी.नेच येण्याबाबत आम्ही सांगत असतो.

- संतोष शिवरकर, सातारा.

कोट

जखमींना तातडीची मदत

एस. टी. अपघातात किरकोळ इजा झाल्यास तातडीने एक हजाराची मदत मिळते. तसेच प्रवासादरम्यान अपघाती मृत्यू झाल्यास तिकीटावर दहा लाखांचा विमा आहे. त्यामुळे एस. टी.चा प्रवास सुरक्षित आहे.

- रेश्मा गाडेकर

आगार व्यवस्थापक, सातारा.

एस. टी.चे अपघात

२०१८

२०१९

२०२०

२०२१ (जुलैपर्यंत)

Web Title: S. T. Safe but Mumbaikars love travels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.