शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रयत क्रांती संघटनेची 'वारी शेतकऱ्याची' साताऱ्यात; सदाभाऊंनी वाजवला ढोल

By नितीन काळेल | Updated: May 25, 2023 15:34 IST

रयत क्रांती शेतकरी संघटनेने विविध मागण्यासाठी २२ मे पासून ' वारी शेतकऱ्यांची ' ही पदयात्रा सुरू केली आहे.

सातारा : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी कऱ्हाड येथून निघालेली रयत क्रांती शेतकरी संघटनेची 'वारी शेतकऱ्यांची ' पदयात्रा गुरुवारी दुपारी ढोल वाजवत साताऱ्यात धडकली. यावेळी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यादरम्यान सदाभाऊ खोत यांनी शासनाने मागण्या मान्य न केल्यास मुंबईत धडक देणार असल्याचा इशारा दिला. तर शहरात येण्यापूर्वी सदाभाऊंनी शिवराज चौकात महामार्गावरच ठिय्या मांडल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.    

रयत क्रांती शेतकरी संघटनेने विविध मागण्यासाठी २२ मे पासून ' वारी शेतकऱ्यांची ' ही पदयात्रा सुरू केली आहे. कऱ्हाड येथील महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करूनही यात्रा मार्गस्थ झाली. तीन मुक्कामानंतर ही यात्रा गुरुवारी दुपारच्या सुमारास सातारा शहरात आली. यावेळी शिवराज पेट्रोल पंप चौकात सदाभाऊ खोत यांच्याबरोबरच शेतकऱ्यांनी महामार्गावरच ठिय्या मांडला. यामुळे वाहतुकीला अडथळा आला. तसेच पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी विनंती केल्यानंतर सदाभाऊ पुन्हा पदयात्रेबरोबर चालत बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आले. त्यानंतर ही पदयात्रा जिल्हा परिषद मार्गे पोवई नाक्यावर आली. यावेळी शेकडो शेतकरी तसेच सरपंच परिषदेचे पदाधिकारी व ऊस वाहतूकदार सहभागी झाले होते.      

पोवई नाक्यावर पदयात्रा आल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी मागण्याविषयी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर सदाभाऊ खोत म्हणाले,  आमच्या मागण्या सरकारकडे मांडण्यात आल्या आहेत. सरकारमधील काही मंत्री आम्हाला सामोरे येत आहेत. या शासनाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांचे म्हणणे आम्हाला योग्य वाटले तर आम्ही थांबू. नाहीतर आम्ही मुंबईला जाणारच आहोत. दरम्यान, सातारा येथून सदाभाऊ लगेच पुढे मार्गस्थ झाले. महामार्गाशेजारील यशोदा कॅम्पस येथे दुपारची विश्रांती त्यांनी घेतली. या आहेत प्रमुख मागण्या... 

रयत क्रांती संघटनेने विविध मागण्यांसाठी पदयात्रा काढली आहे. यामध्ये गुजरातच्या धर्तीवर उसाला दर देण्यात यावा. इथेनॉल निर्मितीसाठी शेतकरी कंपनीला परवानगी मिळावी. दोन साखर कारखान्यामधील २५ किलोमीटर अंतराची अट रद्द करावी. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिल अट बँकांनी बंद करावी. ऊस तोडणीचे करार महामंडळाच्या वतीने करण्यात यावेत. मुंबईत सरपंच भवन उभारण्यात यावे. सरपंचांनाही एसटीत मोफत प्रवास मिळावा, अशा या मागण्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन