शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील ग्रामीण डाकसेवक संपावर; टपाल सेवा, आर्थिक व्यवहार ठप्प

By सचिन काकडे | Updated: December 12, 2023 17:18 IST

सातारा : आधुनिक संचार माध्यमांच्या काळातही आपले अस्तित्व टिकवून असलेल्या टपाल खात्याच्या ग्रामीण डाकसेवकांनी मंगळवारपासून (दि. १२) देशव्यापी संप ...

सातारा : आधुनिक संचार माध्यमांच्या काळातही आपले अस्तित्व टिकवून असलेल्या टपाल खात्याच्या ग्रामीण डाकसेवकांनी मंगळवारपासून (दि. १२) देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात राज्यातील वीस हजार व सातारा जिल्ह्यातील सर्व डाकसेवक सहभागी झाले आहेत. या संपामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. ग्रामीण भागातील डाक कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा इशारा अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सातारा विभागीय सेक्रेटरी राजकुमार चव्हाण व कऱ्हाड विभागीय सेक्रेटरी जयवंत शिर्के यांनी दिला. ग्रामीण भागातील डाक सेवकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कामाची वेळ आठ तासाची असून त्यांना चार तासाचेच वेतन मिळत आहे. संघटनेच्या वतीने जीडीएस कर्मचाऱ्यांना आठ तासाचे काम देऊन नियमित कर्मचारी म्हणून घोषित करावे, २०१६ रोजीच्या कमलेशचंद्र  कमिटीच्या शिफारशी लागू कराव्यात, विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारी रजा, घरभाडे भत्ता, टीए, डीए, पेन्शन, वैद्यकीय सुविधा, शिक्षण भत्ता सुविधा लागू कराव्यात, इंडीया पोस्ट पेमेंट बँकेचे काम कमिशन ऐवजी वर्कलोडमध्ये सामाविष्ट करण्यात यावे, अशा मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत केंद्रशासन वेळ काढूपणा करत असल्याने संघटनेने देशव्यापी संप पुकारला असून, सातारा जिल्ह्यातील डाक सेवक या संपात सहभागी झाले आहेत. साताऱ्यातील पोवई नाक्यावर असलेल्या मुख्य टपाल कार्यालयाबाहेर टपाल सेवकांकडून मंगळवारी दुपारी जोरदार घोषणा देण्यात आल्या. या संपामुळे ग्रामीण भागातील बचत खाते भरणा, स्पीड बुकिंग वाटप, मुलाखत पत्र, मनीऑर्डर सेवा, रजिस्ट्री पत्र, आरडी, वीज बिल भरणा, सुकन्या योजनेचे काम ठप्प झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPost Officeपोस्ट ऑफिसagitationआंदोलन