शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भाग शहरांशी जोडणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:09 IST

सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदी पदाचा पदभार स्वीकारला 

सातारा : राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भाग शहरांशी जोडून ग्रामीण भाग अधिकाधिक विकास प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण केले जाईल. मंत्रिपदाच्या माध्यमातून राज्यात उठावदार काम करणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.मुंबई येथे मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (इमारती) संजय दशपुते, मुख्य अभियंता (कोकण) शरद राजभोज, मुख्य अभियंता (मुंबई) राजेंद्र रहाणे यांच्यासह राज्यातील बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, फिरोज पठाण, अक्षय जाधव, ओमकार भंडारे आदी उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी मंत्रालयातील महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. याप्रसंगी शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदी काम करण्याची जबाबदारी सोपवली आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते महत्त्वाचे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात रस्त्याचे जाळे निर्माण केले जाईल. राज्याचा जास्तीत जास्त ग्रामीण भाग शहरांना जोडण्याचा प्रयत्न राहील. राज्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य राहील, असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वाला नेणारसातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले आहे. ते पूर्णत्वाला नेले जाईल. सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील विकासकामांना चालना देणार असल्याची माहिती यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेroad transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्ग