रनर.. रीडर अन् स्पिनर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:38+5:302021-06-27T04:25:38+5:30

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना अनेकांना २४ तासही पुरत नाहीत अशी स्थिती एकीकडे असताना दुसरीकडे डॉ. काटे यांच्यासारखे छंद जोपासणारे ...

Runner .. Reader and Spinner! | रनर.. रीडर अन् स्पिनर!

रनर.. रीडर अन् स्पिनर!

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना अनेकांना २४ तासही पुरत नाहीत अशी स्थिती एकीकडे असताना दुसरीकडे डॉ. काटे यांच्यासारखे छंद जोपासणारे अभावानेच पहायला मिळतात. उत्तम चाललेली वैद्यकीय सेवा सांभाळून त्यांनी आपले छंदही जोपासले आहेत. त्यांच्या मते, मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे. आगामी काळात उत्तम व्यायाम आणि योग्य आहाराच्या समीकरणातून फिट सातारा करण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यासाठी लवकरच ते समाजमाध्यमातून पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येणार आहेत.

चौकट :

सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे जनक

स्वत:च्या तंदुरुस्तीसाठी धावण्यास सुरुवात करणाऱ्या डॉ. काटे यांनी एप्रिल २०१२ मध्ये कॉर्बेट नॅशनल पार्क येथे आपला पहिला हाफ मॅरेथॉन पूर्ण केला आणि आपल्या शहरातही अशी स्पर्धा सुरू करावी यासाठी प्रयत्न केले. पत्नी सुचित्रा आणि डॉ. काटे यांच्या मित्रांनी मॅरेथॉनची संकल्पना उचलून धरली आणि बघता बघता ही स्पर्धा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट झाली. पहिल्यावर्षी अगदी हजारभर स्पर्धकांवर ही स्पर्धा सुरू झाली, आता मात्र मर्यादित कालावधीसाठी लिंकद्वारे सुरू केलेली नोंदणी अवघ्या काही तासांत संपते. दरवर्षी पाच हजारांहून अधिक स्पर्धक सातारा मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी येतात, याचं मूळ श्रेय डॉ. काटे यांचेच आहे.

धम्माल कॉमिक्सचा खजिना

बालवयात संस्कार करणारी पुस्तकं आपण मोठं झालो की नजरेसच पडत नाहीत. हा विचार करून डॉ. संदीप काटे यांनी लहान मुलांच्या विश्वात धुमाकूळ घालणारे चांदोबा, चंपक, टिंकल, अमर चित्रकथा, इंद्रजाल यासारखे कॉमिक्स शोधण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, स्विडन येथूनही त्यांनी फॅन्टमचे कॉमिक्स आपल्या संग्रहालयात ठेवले आहेत. या ग्रंथसंपदेचा हजारो चिमुकल्यांनी लाभ घेतला आहे. देशभरातील रद्दी व्यावसायिकांशी बोलून त्यांनी ही पुस्तके साताऱ्यात त्यांच्या निवासस्थानी आणली. डॉ. काटे यांच्या मते या पुस्तकांनी अनेक पिढ्या घडविल्या. आता ही पुस्तके रद्दीत मिळतात. १ रुपयाचे पुस्तक आता १० ला झाले पण ते खरोखर अमूल्य आहे.

भवऱ्यांचा अनोखा नाद!

शाळेत असताना भवरा फिरवतोय म्हणून कुटुंबीयांचा प्रसाद खाल्ला पण त्याच्याविषयीचे आकर्षण काही केल्या कमी झालं नाही. एकदा फेसबुकवर काही शोधत असताना भवऱ्याचं दर्शन झालं आणि हा खेळ पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी भवरे गोळा करायला सुरुवात केल्याचं डॉ. संदीप काटे सांगतात. पहिली परदेशी वारी सिंगापूरला करताना त्यांनी तेथील सुलतान मार्केटमध्ये पश्चिम आशिया देशातील भवरे मिळाले. नखाच्या आकारा इतका लहान आणि साठ किलो वजनाचा भवरा त्यांच्या संकलनात आहे. जगभरातून गोळा केलेले १२५ हून अधिक भवरे त्यांना खूपच कमी वाटतात. इंटरनॅश्नल टॉप स्पिनर असोसिएशनचे भारताचे राजदूत म्हणूनही काम करतात.

पॉइंटर :

कॉमिक्सचा खजिना

चांदोबा : ४००

चंपक : १००

टिंकल : ५००

अमर चित्रकथा : ४५०

इंद्रजाल : ७५०

फॅन्टम कॉमिक्स : ७५०

भवऱ्यांचे अनोखे विश्व : १२५

Web Title: Runner .. Reader and Spinner!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.