शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Shambhuraj Desai: सातारा जिल्हा परिषदेत राडा! पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी; भाजप कार्यकर्त्यांवर धक्काबुक्कीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 16:35 IST

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू असताना भाजपा आणि शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि ढकलाढकली झाली.

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रिया आज पार पडली. भाजपाने मोठा विजय मिळवत पहिल्यांदाच सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली.  दरम्यान, आजच्या निवड प्रक्रियेला हिंसक वळण लागले. या निवडीदरम्यान झालेल्या प्रचंड गोंधळात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या डाव्या हाताला जखम झाली असून, त्यांना भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

CM फडणवीसांच्या एका फोननंतर शिवेंद्रराजेंनी केली खेळी; शिंदेसेना-राष्ट्रवादीला बसला धक्का

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू असताना भाजपा आणि शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि ढकलाढकली झाली. या गर्दीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पत्रकारांसोबत बोलताना देसाई म्हणाले की, "गर्दीत मला नेमका धक्का कसा लागला हे सुरुवातीला समजले नाही. मात्र जेव्हा हाताला जखम होऊन रक्त येऊ लागले, तेव्हा दुखापतीची जाणीव झाली." या घटनेनंतर देसाई समर्थक आक्रमक झाले असून, याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा त्यांनी दिला आहे.

मकरंद पाटलांचे पोलिसांवर गंभीर आरोप

या राड्यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. "पोलीस बळाचा चुकीचा वापर करून विरोधी सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. जर थेट मंत्री आणि लोकप्रतिनिधींवरच पोलीस धावून येत असतील, तर ही लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर बाब आहे," असे पाटील म्हणाले.

शशिकांत शिंदेंचा 'रस्त्यावरच्या लढाई'चा इशारा

दुसरीकडे, आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रशासनावर टीका केली आहे. "आमच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार असतानाही पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने सभागृहाबाहेर काढले. प्रशासनाचा गैरवापर करून आमच्या सदस्यांवर दबाव टाकण्यात आला आणि त्यांना हात वर करण्यास भाग पाडले," असा खळबळजनक आरोप शिंदेंनी केला. "आम्ही हा अन्याय सहन करणार नाही, आता याविरोधात रस्त्यावरची लढाई लढू," असा इशाराही त्यांनी दिला.

या घटनेमुळे साताऱ्यात तणावाचे वातावरण असून, पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Clash in Satara Parishad: Minister Injured, BJP Accused of Assault

Web Summary : Satara Zilla Parishad election marred by violence. Minister Shambhuraj Desai injured amid clashes, BJP workers accused of assault. Accusations of police misconduct and unfair pressure surface, escalating tensions and prompting threats of protests.
टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईBJPभाजपाZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५