शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

२०० कोटींची योजना १४०० कोटींंवर : उरमोडीच्या सिंचन कामावर १०६२ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:31 IST

सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सिंचन योजनेवर फेब्रवारीअखेर १०६२ कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. मुळात ही मूळ योजना

ठळक मुद्देपुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधांची कामे अद्यापही अपूर्ण

नितीन काळेल ।सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सिंचन योजनेवर फेब्रवारीअखेर १०६२ कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. मुळात ही मूळ योजना २१२.०७ कोटींची होती. आता त्याची सुधारित किंमत १४१७.७५ कोटींवर पोहोचली आहे. या योजनेतील कालव्याची कामे

गतीने सुरू असतानाही अद्याप प्रकल्पग्रस्त स्थलांतरित होणाºया काही गावठाणातील कामे अपूर्ण आहेत.राज्यात १९९५ मध्ये युती शासन सत्तेत आल्यानंतर कृष्णा खोरे विकास महामंडळ अस्तित्वात आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात धरणाची कामे हाती घेण्यात आली. त्यावेळी सातारा तालुक्यातील परळीजवळ उरमोडी नदीवर धरण बांधण्याचा निर्णय झाला. उरमोडी प्रकल्पांतर्गत धरणाचे काम पूर्ण झाले असून, २०१० च्या जून महिन्यापासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येत आहे.

उरमोडी नदीवर असणारे हे धरण ५०.१० मीटर उंचीचे असून, १८६० मीटर लांबी आहे. या धरणात एकूण ९.९६ टीएमसी इतका पाणीसाठा होत आहे. या धरणातील पाण्यावर माण, खटाव आणि सातारा तालुक्यातील बहुतांशी शेती अवलंबून आहे. त्यासाठी आवश्यक असणाºया कालव्याची कामे अद्यापही सुरू आहेत. या सिंचन प्रकल्पाची मूळ प्रशासकीय मान्यताप्राप्त किंमत २१२.०७ कोटी (२०००-२००१ ची दरसूची) होती. तर अद्ययावत सुधारित किंमत १४१७.७५ कोटींवर पोहोचली आहे.दरवर्षी शेतकºयाला हेक्टरी चार हजार खर्चउरमोडी धरणावर अवलंबून असणाºया पाणी योजनेमुळे माण आणि खटाव तालुक्याला मोठा फायदा होणार आहे. यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरवर होणारे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. तसेच उन्हाळ्यातही सिंचनाची सुविधा होणार आहे. या योजनेसाठी शेतकºयाला दरवर्षी हेक्टरी अवघा चार हजार रुपये खर्च येणार आहे. तसेच सध्या या सिंचन योजनेतून अवघे ३५०० हेक्टर क्षेत्र भिजत आहे. माणमध्ये कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी सुरू आहे. कामे पूर्ण नसल्याने अनेक ठिकाणी ओढे, तलावात पाणी सोडण्यात येत आहे.

धरणातील पाण्याचा वापर सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी करण्याचे नियोजन आहे; पण सध्या कालव्यांची कामे सुरू असल्याने फक्त ४ ते ५ टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. त्यामुळे धरणात बरेच पाणी शिल्लक राहते. येत्या दोन वर्षांत संपूर्ण पाण्याचा वापर होईल, असे उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :water transportजलवाहतूकSatara areaसातारा परिसर