रयतकडून मुख्यमंत्री सहायता निधीस दोन कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:47 IST2021-09-10T04:47:45+5:302021-09-10T04:47:45+5:30
मुंबई रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-१९) साठी दोन कोटी ३६ लाख ८४ हजार ७५७ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री ...

रयतकडून मुख्यमंत्री सहायता निधीस दोन कोटींचा निधी
मुंबई
रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-१९) साठी दोन कोटी ३६ लाख ८४ हजार ७५७ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वर्षा निवासस्थान येथे सुपूर्द केला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी या निधीसाठी एक दिवसाचे वेतनाचे योगदान दिले आहे. या निधीचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधी कोविड-१९साठी देण्यात आला आहे. रयत शिक्षण संस्थेने यापूर्वीही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटी रुपयांचा निधी दिला होता. प्रत्येक अडचणीच्या कालावधीत रयत शिक्षण संस्था मदत करत असते. या संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार असल्यामुळे सामाजिक भावनेतून हा निधी वितरित करण्यात आला आहे. रयत शिक्षण संस्था ही राज्यातील नावाजलेली संस्था असून, कर्मचाऱ्यांनीही सामाजिक जाणीव ठेवत मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी हा निधी दिला आहे.