शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हा बँकेच्या वडगाव शाखेत दरोडा: औंध पोलिसांनी संशयित आरोपींना ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 14:53 IST

गॅसकटरच्या सहाय्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चोरट्यांच्या हाती रोकड लागली नाही.

पुसेसावळी: खटाव तालुक्यातील वडगाव (ज.स्वा) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील दरोडयातील चोरटयांना औंध व पुसेसावळी पोलिसांकडून काही तासात उलगडा करुन संशयितांना बेड्या ठोकल्या. हर्षवर्धन हरिशचंद्र घार्गे (वय २०, रा. शाहुनगर ता. जि. सातारा, यश संजय घार्गे (१९, रा. दौलत नगर ता. जि. सातारा) व रूषीकेश सोमनाथ नागमल (२०, रा. वडगांव ज.स्वा.ता.खटाव जि.सातारा) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरातील ग्रामस्थांकडून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, काल, रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वडगाव येथील शाखेवर दरोडा टाकला होता. बँकेच्या खिडकीचे लोखंडी गज कापून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. तसेच गॅसकटरच्या सहाय्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चोरट्यांच्या हाती रोकड लागली नाही.या घटनेची माहिती मिळताच तात्काळ औंध पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्राप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांच्या तीन वेगवेगळया टिम बनवून सीसीटीव्ही व मोबाईल सीडीआर यांचे तांत्रिक माहितीवरून दोन संशयीत आरोपींना गुन्हयात वापरण्यात आलेली चार चाकी स्कॉरपीओ क्रमांक एम एच ०६ क्यू. ८८८८ ही गाडीसह सातारा येथून ताब्यात घेतले. तसेच एका आरोपीस वडगांव ज.स्वा. ता. खटाव येथून ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस