शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस असल्याचे भासवून वृध्दाला लुटले, सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा

By नितीन काळेल | Updated: June 22, 2023 13:59 IST

हातचलाखी करुन दगड असणारी पुडी वृध्दाच्या खिशात ठेवली

सातारा : सातारा शहराजवळील एमआयडीसीत पोलिस असल्याने भासवून वृध्दांचे दागिने लंपास करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अनोळखी दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी शिवाजी राजाराम कणसे (रा. गोडोली, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार दि. २१ जून रोजी सकाळी पावणे आठच्या सुमारास एमआयडीसीतील स्वाती आॅइल मिल समोर हा प्रकार घडला.शिवाजी कणसे हे पत्नीबरोबर घराकडे चालत येत असताना एक अनोळखी जवळ आला. त्याने आवाज देऊन तुम्हाला कोणीतरी पुढे आवाज देत आहे असे सांगितले. पुढे गेल्यावर दुचाकीजवळ उभा राहिलेल्या दुसऱ्या अनोळखीने मी पोलिस आहे. तुमच्या सुरक्षेसाठी आमचा बंदोबस्त चालू आहे. त्यामुळे तुमच्या हातातील अंगठ्या व पत्नीच्या गळ्यातील गंठन काढून द्या, मी तुम्हाला परत देतो असे सांगितले. त्याप्रकरणे दोन सोन्याच्या अंगठ्या आणि मिनी गंठण संबंधिताला देण्यात आला. त्यावेळी त्याने कागदाच्या पुडीमध्ये दागिने ठेवले. त्यानंतर हातचलाखी करुन दगड असणारी पुडी वृध्दाच्या खिशात ठेवली. संबंधित गेल्यानंतर पुडी पाहिल्यावर त्यात दगड आढळून आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस दोघा भामट्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस