चाफळ विभागात रस्त्यांची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:36 IST2021-02-12T04:36:55+5:302021-02-12T04:36:55+5:30

चाफळ : विभागातील पाडळोशी, विरेवाडी, धायटीसह परिसरातील वाडी-वस्तीवर जाणाऱ्या रस्त्यांंची अक्षरश: चाळण झाली आहे. चाफळ विभागातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे ...

Road sifting in Chafal section | चाफळ विभागात रस्त्यांची चाळण

चाफळ विभागात रस्त्यांची चाळण

चाफळ : विभागातील पाडळोशी, विरेवाडी, धायटीसह परिसरातील वाडी-वस्तीवर जाणाऱ्या रस्त्यांंची अक्षरश: चाळण झाली आहे.

चाफळ विभागातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडल्याने चालकांना वाहन चालवणे अवघड झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन खड्डे भरुन रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी या विभागातील ग्रामस्थांनी केली आहे. गत काही महिन्यांपासून चाफळ, पाडळोशी, केळोली, विरेवाडीकडे जाणाऱ्या पंधरा किलोमीटरच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यावर खड्डा, हेच ओळखणे कठीण झाले आहे.

सध्या या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, त्यातून चालणेही अवघड झाले आहे. चालकांना वाहन चालवणेही जिकरीचे बनले आहे. तर दुसरीकडे एस. टी. या रस्त्यावर बंद पडल्यास किवा पंक्चर झाल्यास दिवसभर या भागात एस. टी. येत नाही. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती होणे गरजेचे आहे.

Web Title: Road sifting in Chafal section