रिंकू ओसवाल खूनप्रकरणी पतीला जन्मठेप -हुंड्यासाठी गळा दाबला : जिल्हा न्यायालयाचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 20:42 IST2018-06-06T20:42:26+5:302018-06-06T20:42:26+5:30
साताऱ्यातील बहुचर्चित रिंकू ओसवाल खूनप्रकरणी पती भरत कांतिलाल ओसवाल (वय ३१, रा. आयटीआय जवळ, गुलमोहोर कॉलनी, सातारा) याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायाधिशांनी जन्मठेपेची शिक्षा
_201707279.jpg)
रिंकू ओसवाल खूनप्रकरणी पतीला जन्मठेप -हुंड्यासाठी गळा दाबला : जिल्हा न्यायालयाचा निकाल
सातारा : साताऱ्यातील बहुचर्चित रिंकू ओसवाल खूनप्रकरणी पती भरत कांतिलाल ओसवाल (वय ३१, रा. आयटीआय जवळ, गुलमोहोर कॉलनी, सातारा) याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायाधिशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हुंड्यासाठी गळा आवळून तिचा खून केल्याचा आरोप भरतवर होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, भरत ओसवाल यांचा रिंकू ऊर्फ भाग्यश्री हिच्यासोबत विवाह झाला. विवाहात रिंकूच्या माहेरच्या मंडळींनी ठरल्याप्रमामे कमी दागिने दिले. यावरून पती भरत उर्वरित आठ तोळे दागिने घेऊन येण्याच्या कारणावरून रिंकूला मारहाण व शिवीगाळ करत छळ करत होता. लग्नाला तीन वर्षे झाली तरी मूलबाळ होत नसल्याने भरतकडून दिवसेंदिवस त्रास वाढ होत होता.
१९ आॅक्टोबर २०१४ रोजी रात्री जेवण केल्यानंतर रिंकू व भरत यांच्यामध्ये भांडणे झाली. यावेळी भरतने तिचा गळा आवळला. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. मात्र, माहेरच्या लोकांनी रिंकूचा मृत्यू संशयास्पद असल्याचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार करण्यात आला. याप्रकरणी रिंकूची आईने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. एल. पांढरे गुन्'ाचा तपास करून दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर केले. न्यायाधीश डी. ए. ढोलकिया यांनी भरत ओसवाल याला जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी काम पाहिले. प्रॉसिक्युशनचे उपनिरीक्षक पी. के. कबुले, हवालदार सुनील सावंत, अजित शिंदे, शमशुद्दीन शेख, कांचन बेंद्रे, नंदा झांजुर्णे, शाहूपुरीच्या पैरवी अधिकारी रिहाना शेख यांनी मदत केली.
शवविच्छेदन रिपोर्ट ठरला निर्णायक
या खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे सादर केले शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय अधिकारी, मृत रिंकूची आई, काका यांच्यासह ११ जणांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे ग्रा' धरून न्यायाधिशांनी शिक्षा सुनावली.