शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ एसटी नव्हे आता रिक्षा!

By admin | Updated: August 18, 2015 22:26 IST

बसस्थानक प्रशासनाबाबत संताप : गाड्यांच्या बिघाडामुळेच प्रवाशांची रिक्षाला पसंती--लोकमत विशेष...

कऱ्हाड : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ म्हणून परिवहन महामंडळाने ग्रामीण भागात एसटीची सोय केली. मात्र सध्या ‘हात दाखवा एसटी थांबवा’, ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीद वाक्याचा विसर एसटी प्रशासनास पडलेला दिसतो. याउलट शहरातील रिक्षाचालकांनी प्रवाशी व विद्यार्थ्यांना तत्पर सेवा देण्यास सुरूवात केली आहे. तत्पर आणि जलद सेवेमुळे ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ एसटी नव्हे तर आता ‘रिक्षा’च अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.कऱ्हाड येथे बसस्थानकाच्या कामामुळे एसटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीकडे दुर्लक्ष केले जात आहे. याउलट प्रवाशांच्या सेवेसाठी रिक्षावाले धावून आले आहेत. त्यांच्याकडून शाळेतील मुलांना सात रूपयांत तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दहा रूपयांत प्रवास घडवला जात आहे. जिल्ह्यातील जास्त उत्पन्न देणाऱ्या कऱ्हाड आगाराची जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांची मात्र, पुरती गैरसोय होत आहे. बसस्थानकात वेळेवर गाडी येत नसल्याने त्यांना उन्हात ताटकळत उभे रहावे लागत आहे. पास काढूनही वेळ अन् पैसा वाया जात असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी एसटी प्रशासनाने केलेल्या सोयीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत एसटी प्रशासनाकडून काहीच कार्यवाही केली जात नसल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांमधून प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.शहरात सध्या चाळीसहून अधिक रिक्षा थांबे आहेत. त्या थांब्यावरून दीड हजाराहून अधिक रिक्षा शहर व परिसरात धावत असतात. बसस्थानकाचे काम सुरू असल्याने स्थानक प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात शहरातील विविध ठिकाणी स्थानकाचे स्थलांतर केले आहे. भेदा चौक, कृष्णा नाका, उपजिल्हा रूग्णालय, कोल्हापूर नाका, ढेबेवाडी फाटा या ठिकाणी एसटी थांबत आहेत. त्यामुळे रिक्षा संघटनांनी संबंधित ठिकाणी रिक्षा वाढवून प्रवाशांची व विद्यार्थ्यांची वाहतूक केली जातेय. शहरातील कार्वेनाका, दिवंगत यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ, कृष्णानाका या ठिकाणी जाण्यासाठी तीस रूपये भाडे आकरणी तर नेहरू चौक, आझाद चौक, भाजी मंडई या परिसरात जाण्यासाठी वीस रूपये भाडे प्रवाशांकडून रिक्षाचालक आकारत आहेत. मध्यंतरी काही रिक्षा चालकांकडून वाढीव प्रवासभाडे आकारत प्रवाशांची लुबाडणूक केली जात होती. अजुनही ती सुरू आहे. मात्र, प्रवाशांच्या सेवेसाठी रिक्षा अजूनही तत्परतेने काम करत आहेत. (प्रतिनिधी) ५२ वर्षाचं बसस्थानक जमिनदोस्तकऱ्हाड हे महामंडळाला मोठे उत्पन्न देणारे बसस्थानक आहे. १९६२ मध्ये बांधण्यात आलेल्या या बसस्थानक इमारतीला नुकतीच ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही इमारत जमिनदोस्त करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या बसस्थानकातून दररोज १ हजार ६०० एसटीची ये जा होत असते. हजारो प्रवाशांना उपयुक्त असलेल्या बसस्थानकाची जागा अपुरी पडत आहे. ‘कृष्णा’ अ‍ॅटो रिक्षा संघटना आक्रमककोल्हापूर नाका येथील उड्डाण पुलाखाली जागा द्यावी, भेदा चौक येथे रिक्षा थांबे वाढवावेत, उपविभागीय अधिकारी कार्यालय आवारात रिक्षा थांबे उभारण्यासाठी परवानगी द्यावी तसेच साई मंदीर परिसरात जादा रिक्षा थांबण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन कृष्णा कऱ्हाड तालुका अ‍ॅटो रिक्षा चालक- मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांना दिले आहे.एसटीला अद्यापही ‘ढकलस्टार्ट’मुख्यमंत्रीपदी असताना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निधीतून बसस्थानकाच्या नुतनीकरणासाठी ११ कोटी निधी मंजूर केला आहे. मात्र, आजही या बसस्थानकातील काही एसटी नादुरूस्त अवस्थेत आहेत. दररोज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या एसटी धक्का मारून सुरू कराव्या लागत आहेत.