सापडलेला ९० हजारांचा धनादेश केला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST2021-03-21T04:39:11+5:302021-03-21T04:39:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गोडोली नाका परिसरात रस्त्यात सही असलेला ९० हजारांचा चेक गॅरेज कामगार असणार्‍या किरण भोसले ...

Returned check of Rs. 90,000 found | सापडलेला ९० हजारांचा धनादेश केला परत

सापडलेला ९० हजारांचा धनादेश केला परत

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : गोडोली नाका परिसरात रस्त्यात सही असलेला ९० हजारांचा चेक गॅरेज कामगार असणार्‍या किरण भोसले यांना सापडला. त्यांनी तो प्रामाणिकपणे नजिकच्या गोडोली पोलीस चौकीत जमा केला. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचा पोलिसांनी सत्कार केला.

याबाबत माहिती अशी की, ओमकार दत्तात्रय मोहिते यांचे जनता सहकारी बँकेत करंट खाते आहे. या खात्यातून त्यांनी ९० हजारांचा धनादेश बनवला होता. त्यावर सहीदेखील केली होती. हा धनादेश सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोडोली चौक ते पोवई नाका डांबरी रस्त्यावर गहाळ झाला. दरम्यान, या रस्त्यावर पडलेला हा धनादेश गॅरेजमध्ये काम करणार्‍या किरण रामचंद्र भोसले यांना सापडला. त्यांनी हा धनादेश नजिकच्या गोडोली पोलीस ठाण्यात दिला. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल गोडोली पोलीस चौकीत पोलीस उपनिरीक्षक एस. एच. रोकडे व इतर पोलीस कर्मचार्‍यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Returned check of Rs. 90,000 found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.