शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Satara: जादा परताव्याचे आमिष, हवाई दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला  कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:20 IST

कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल  

कऱ्हाड (जि. सातारा) : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत हवाई दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी अन्य काही जणांची फसवणूक केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.माधव मनोहर काळे (६१, रा. शुक्रवार पेठ, कऱ्हाड) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. किशोर अधिकराव पिसाळ (रा. करवडी, ता. कऱ्हाड) व दीपक बाळकृष्ण यादव (रा. सोळशी, ता. कोरेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जानेवारी २०२३ मध्ये माधव काळे यांची किशोर पिसाळ याच्याशी ओळख झाली. त्याने स्वत:ला सैन्यदलातून निवृत्त झाल्याचे सांगून विश्वास संपादन केला. तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची संधी असल्याचे सांगून दीपक यादव याच्याशी माधव काळे यांची ओळख करून दिली. दीपक यादव यानेही मी सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकारी आहे, असे माधव काळे यांना सांगितले. तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मी महिन्याला ४ टक्क्यांप्रमाणे वर्षाला ४८ टक्के परतावा देईन, असे आमिष दाखवले. संशयितांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून माधव काळे यांनी वेळोवेळी एकूण एक कोटी दहा लाख रुपये दीपक यादव याच्या बँक खात्यात वर्ग केले. सुरुवातीला माधव काळे यांना संशयितांनी काही रक्कम दिली. संशय आल्यामुळे काळे यांनी सर्व पैसे परत मागितले; मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfraudधोकेबाजीshare marketशेअर बाजार