शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: धरणातील पाणी पिणे अन् शेतीसाठी राखून ठेवा, पालकमंत्री शंभूराज देसाईंची सूचना

By नितीन काळेल | Updated: August 31, 2023 15:59 IST

पाऊस कमी; लम्पींमुळे छावण्याऐवजी चारा डेपोचे प्रस्ताव द्या 

सातारा : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. संभाव्य टंचाई पाहता धरणांतील उपलब्ध पाणीसाठा प्राधान्याने पिण्याच्या पाणी आणि शेतीसाठी राखून ठेवावा. तसेच लंपी चर्मरोगामुळे छावण्याऐवजी चारा डेपोचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावेत, अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत  होते. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, अनिल बाबर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र  डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव आदी उपस्थित होते. पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यातील गळती लागलेल्या उपसा सिंचन योजनाबाबत दक्षता घ्यावी. ही गळती काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाची लवकर बैठक घ्यावी. कालव्यामधून पाणी सोडले जाते ते शेवटच्या शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहचले पाहिजे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे पुनर्नियोजन करावे. उरमोडी आणि कण्हेर धारणांमधील पाणी सातारा शहरासाठी राखीव ठेवावे. कालवे फोडणा-यांवर पाटबंधारे विभागाने गुन्हे दाखल करावेत. 

टंचाईसाठी निधी कमी पडणार नाही...पाणीटंचाईला समोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. यासाठी शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही पालकमंत्री  देसाई यांनी पाणीटंचाई आढावा बैठकीत दिली. टंचाई निर्माण होईल अशा तालुक्यातील जनावरांसाठी लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता छावण्याऐवजी चारा डेपोचे प्रस्ताव प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावेत. मोठ्या गावांमध्ये लोकसंख्येचा विचार करुन टँकरच्या खेपा वाढवाव्यात. विहिर दुरुस्ती, अधिग्रहण तसेच इतर उपाययोजनांचे प्रस्तावही जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावेत. तसेच आमदार यांच्याबरोबर तालुकास्तरीय टंचाई बैठक घ्यावी, असेही पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाईDamधरणWaterपाणीRainपाऊस