शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 23:31 IST

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध पर्यटनस्थळावर पर्यटकांसाठी १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध लागू केले आहेत.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध पर्यटनस्थळावर पर्यटकांसाठी १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये विविध धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे आणि धरणांचाही समावेश आहे.

पावसाळ्यात जिल्ह्यातील पर्यटनस्थळी गर्दी होत असते. या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी निर्बंध लागू केले आहेत. अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केळवली-सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कास पुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव, बामणोली, पंचकुंड धबधबा, सडावाघापूर उलटा धबधबा, उरुल घाट शिव मंदिर धबधबा, रुद्रेश्वर देवालय धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा, लिंगमळा धबधबा तसेच महाबळेश्वर आणि पाचगणीतील पर्यटनस्थळे व धरणे अशा स्थळांच्या परिसरात पर्यटकांमुळे गर्दी होत असते. यासाठी निर्बंध लागू केले आहेत. २० जूनपासूनच हा आदेश लागू झाला आहे.

असे असतील निर्बंध

- पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे व पोहणे यावर बंदी- धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे याला बंदी- पावसामुळे धोकादायक ठिकाणी धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी आणि चित्रीकरण करण्याला बंदी   - धबधब्यांच्या परिसरात मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे याला परवानगी नाही.- वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवता येणार नाही.- सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड, असभ्य वर्तन करणाऱ्यावर कठोर कारवाई- सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा, डीजे वाजविणे यावर बंदी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटनMaharashtraमहाराष्ट्र