आरक्षण द्या... अन्यथा परिणामांना सामोरे जा
By Admin | Updated: June 20, 2014 00:29 IST2014-06-20T00:28:17+5:302014-06-20T00:29:02+5:30
मराठा आरक्षण मेळावा : संभाजीराजे भोसले यांचा इशारा

आरक्षण द्या... अन्यथा परिणामांना सामोरे जा
साखरवाडी : ‘आपला प्रवास बहुजन समाज एकत्र आणण्यासाठी आहे. ही भूमिका स्पष्ट असताना जाती-जातीतील समाज एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न करणाऱ्या पुढाऱ्यांना ती रुचत नाही. ज्या समाजाला आरक्षण दिले आहे त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाची गरज असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पााहिजे, अन्यथा येणाऱ्या निवडणुकांमध्ये परिणामांना सामोरे जा,’ असा इशारा संभाजीराजे भोसले यांनी राज्यकर्त्यांना दिला.
साखरवाडी, ता. फलटण येथे भाजी बाजार मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षण मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार, शिवरुपराजे खर्डेकर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा जयमाला खराडे, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, डी. के. पवार, बी. के. निंबाळकर, बबनराव निकम, विशाल शिंदे, नरेंद्र भोईटे, जिजाऊ ब्रिगेडच्या केंद्रीय सदस्य कमलाताइ् पवार, जितें्र साळुंखे-पाटील, शारदा पवार, सुमनताई भराडे, अर्चना पवार आदी उपस्थित होते.
संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी राज्यात विविध ठिकाणी आयोजित सभांमध्ये जातीभेद संपला नसल्याचे जाणवले. तो संपुष्टात आणला पाहिजे. तरुणांना आवाहन करताना संभाजीराजे म्हणाले, युवकांनी इच्छाशक्तीतून नेतृत्वगुण दाखवले पाहिजे.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अन्यथा राज्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीत परिणामांना सामोरे जावे लागेल.
यावेळी धनंजय साळुंखे-पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, नानासाहेब पवार, डी. के. पवार, नीलेश जगताप आदींचे मार्गदर्शन केले. यावेळी संभाजीराजेंचे सुरवडी येथे स्वागत करण्यात आले. त्यांच्या हस्ते सुरवडी येथील धर्मवीर संभाजीराजे यांच्या पुतळ्याला हार घालून सुरवडी ते साखरवाडी महारॅली काढण्यात आली.
कार्यक्रमास अरूण गायकवाड, जितेंद्र साळुंखे-पाटील, सुशांत निंबाळकर, अशोकशेठ सस्ते, उत्तमराव भोसले, राजेंद्र झेंडे, पोपटराव भोसले, विक्रमसिंह भोसले, समीर भोसले, दिगंबर गरूड, महेश बर्गे, युवराज रणवरे, नितीन शिंदे, संजय निगडे, सुरज भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. (वार्ताहर)