शहरं
Join us  
Trending Stories
1
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
2
बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा...
3
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
4
खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
5
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
6
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
7
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
8
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
9
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
10
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
11
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
12
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
13
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
14
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
15
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
16
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
17
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
18
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
19
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
20
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील पाच पालिकांचं मैदान यंदा ‘खुलं’!; यंदा राजकीय पक्ष, स्थानिक आघाड्यांमध्ये घमासान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 14:04 IST

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर : सातारा, फलटण, वाई, कऱ्हाड, महाबळेश्वर पालिकेत घमासान

सातारा : जिल्ह्यातील एकूण ९ पैकी महत्त्वाच्या ५ पालिकांमध्ये खुला प्रवर्ग, दोन पालिकांमध्ये खुला प्रवर्ग (महिला) तर दोन पालिकांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाले. मेढा नगर पंचायत खुल्या प्रवर्गासाठी आणि लोणंद नगराध्यक्षपद खुला प्रवर्ग (महिला) आरक्षित झाले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी यंदा राजकीय पक्ष व स्थानिक आघाड्यांमध्ये घमासान पाहायला मिळणार आहे.मुंबईतील मंत्रालयात सोमवारी (दि. ६) नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल? याकडे लोकप्रतिनिधींसह राजकीय धुरिणांचे लक्ष लागले होते. ही प्रतीक्षा आता संपली असून, ‘कारभारी’ बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांचे राजकीय भवितव्य स्पष्ट झाले.पाचगणी, मलकापूर अनुसूचित जातीसाठी..जिल्ह्यातील सातारा, फलटण, वाई, कऱ्हाड व महाबळेश्वर या महत्त्वाच्या पाच पालिका खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने येथे यंदा इच्छुकांची संख्या मोठी असणार आहे. रहिमतपूर व म्हसवड या पालिकांत महिला नेतृत्वाला संधी मिळणार असून, येथे खुला प्रवर्ग महिला असे आरक्षण निश्चित झाले आहे. पाचगणी व मलकापूर पालिकेत मात्र यंदा अनुसूचित जाती प्रवर्गाला संधी मिळणार आहे.

सोडतीनंतर ‘कही खुशी, कही गम’आरक्षण जाहीर होताच सातारा, फलटण, कऱ्हाड येथील इच्छुकांच्या गोटात उत्साहाचे वातावरण दिसले, तर ज्यांना आरक्षणामुळे संधी गमवावी लागली, त्यांचा मात्र भ्रमनिरास झाला. आता नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि स्थानिक नेत्यांचा कस लागणार आहे. लवकरच विकासाच्या मुद्द्यांसोबतच राजकीय डावपेचांची आतषबाजी पाहायला मिळणार आहे. या रणसंग्रामात कोणाचे डावपेच यशस्वी होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

असे आहे आरक्षण

  • सातारा : खुला प्रवर्ग
  • फलटण : खुला प्रवर्ग
  • वाई : खुला प्रवर्ग
  • कऱ्हाड : खुला प्रवर्ग
  • महाबळेश्वर : खुला प्रवर्ग
  • रहिमतपूर : खुला प्रवर्ग (महिला)
  • म्हसवड : खुला प्रवर्ग (महिला)
  • पाचगणी : अनुसूचित जाती
  • मलकापूर : अनुसूचित जाती
  • मेढा (नगर पंचायत) : खुला प्रवर्ग
  • लोणंद (नगर पंचायत) : खुला प्रवर्ग (महिला)
English
हिंदी सारांश
Web Title : Satara Municipality Elections: Open Field Creates Political Fervor This Year

Web Summary : Satara district's municipal elections see open category seats in key locations. Political parties gear up for fierce competition. Some celebrate, others face disappointment as reservation changes impact prospects. Alliances and strategies will determine the victors.