शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

खाद्यतेल मागणी कमी; दर स्थिर, पालेभाज्या उतरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 15:03 IST

CoronaVirus vegetable Satara : कोरोना विषाणुमुळे लॉकडाऊन असल्याने खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दर स्थिर राहिला आहे. मात्र, दुसरीकडे पालेभाज्यांचा भाव उतरला असून वाटाण्याचाच फक्त दर वाढला आहे. सातारा बाजार समितीत वाटाण्याला क्विंटलला ८ ते १० हजारांपर्यंत भाव मिळत आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देखाद्यतेल मागणी कमी; दर स्थिर, पालेभाज्या उतरल्या वाटाण्याला क्विंटलला १० हजारांपर्यंत भाव

सातारा : कोरोना विषाणुमुळे लॉकडाऊन असल्याने खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दर स्थिर राहिला आहे. मात्र, दुसरीकडे पालेभाज्यांचा भाव उतरला असून वाटाण्याचाच फक्त दर वाढला आहे. सातारा बाजार समितीत वाटाण्याला क्विंटलला ८ ते १० हजारांपर्यंत भाव मिळत आहे.सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक राहतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यातून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही माल येत असतो. मात्र, कोरोना लॉकडाऊन असल्याने मागील काही दिवसांत आवक कमी झालेली आहे.

सातारा बाजार समितीत रविवारी ६७४ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांदा १८३, बटाटा १७८, लसूण १२ आणि आल्याची ४ क्विंटल आवक राहिली. आंबा, खरबूज, कलिंगड यांचीही आवक झाली.सोयाबीन तेल डबा २४००मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. सध्या लॉकडाऊन असून दर स्थिर असलातरी सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहेच. सूर्यफूल तेल डबा २५५० ते २६०० पर्यंत मिळत आहे. शेंगतेल डबा २७०० ते २८००, सोयाबीनचा २४०० रुपयांपर्यंत मिळत आहे. तर पामतेल डबा २१०० रुपयांपर्यंत आहे.आंब्याची आवक वाढलीसातारा बाजार समितीत आंबा, कलिंगड, खरबूज आवक होत आहे. रविवारी आंब्याची सर्वाधिक ४२ क्विंटलची आवक झाली. तर कलिंगडाची आवक थोडी झाली.मिरचीला दर...सातारा बाजार समितीत वांग्याला १० किलोला १०० ते १५० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला ८० ते १००, फ्लॉवर १०० ते १५०, दोडका २०० ते २५०, मिरचीला २५० ते ३०० रुपये दर १० किलोला मिळाला. तर कांद्याला क्विंटलला १२००, लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळाला.

कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. मंडई बंद आहेत. त्यामुळे घरासमोर विक्रेते येतात. त्यांच्याकडून खरेदी करतो. दर अधिक असतो. तसेच सर्व भाज्या मिळत नाहीत.- रामचंद्र काळे, ग्राहक

मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. दरात तेजी असल्याने सोयाबीन तेलाला मागणी आहे. सध्या लॉकडाऊनमुळे दुकाने बंद आहेत. दर स्थिर राहिले आहेत.- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे भाज्यांना मागणी कमीच आहे. बाजार समितीतही शेतमालाला दर कमी आहे. काही शेतमाल तर विक्रीअभावी कुजून जाऊ लागलाय.- प्रकाश पाटील, शेतकरी

 

टॅग्स :MarketबाजारSatara areaसातारा परिसरvegetableभाज्या