शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नदीकाठी लाल मातीचे उत्खनन वृक्षांच्या मुळावर : झाडांची सर्रास कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:07 IST

दीपक पवार ।तांबवे : कोयना नदीकाठावर होणारे लाल मातीचे उत्खनन वृक्षांच्या मुळावर उठले आहे. ठेकेदार मातीचे उत्खनन करताना अडथळा ठरणारी मोठमोठी झाडे मुळासह उपटून काढत असल्यामुळे अनेक वृक्ष नष्ट होत आहेत. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे. तसेच लाल मातीच्या बेकायदा उत्खननावरही महसुल विभागाचा अंकुश राहिला नसल्याचे चित्र आहे.पर्यावरणाचा समतोल राहावा, ºहास ...

ठळक मुद्देअनेक वृक्ष मुळासह उखडले; ठेकेदाराचा मनमानी कारभार; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

दीपक पवार ।तांबवे : कोयना नदीकाठावर होणारे लाल मातीचे उत्खनन वृक्षांच्या मुळावर उठले आहे. ठेकेदार मातीचे उत्खनन करताना अडथळा ठरणारी मोठमोठी झाडे मुळासह उपटून काढत असल्यामुळे अनेक वृक्ष नष्ट होत आहेत. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे. तसेच लाल मातीच्या बेकायदा उत्खननावरही महसुल विभागाचा अंकुश राहिला नसल्याचे चित्र आहे.

पर्यावरणाचा समतोल राहावा, ºहास होऊ नये, यासाठी शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देत आहे. ‘एक मूल, एक झाड’ असेही समीकरण शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. गावोगावी शाळा, कॉलेज, ग्रामपंचायत, वनविभाग यांच्या माध्यमातून झाडे लावली जात आहेत. मात्र, कोयना नदीकाठे लाल मातीसाठी झाडे मुळासकट उपटून टाकली जात आहेत. याकडे महसूल विभाग, वन विभागाने लक्ष दिले पाहिजे; पण असे न होता माती उपसा करणाºया ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार येथे होताना दिसत आहे. ठेकेदार जेसीबीने झाडे पाडत आहेत. याला जबाबदार कोण, असा सवाल सध्या ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.

म्होप्रे, साकुर्डी, वसंतगड, तांबवे, सुपने, केसे, वारूंजी आदी गावातील कोयना नदीच्या काठावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत. तसेच लाल मातीचे प्रमाणही जास्त आहे. यापैकी काही ठिकाणी माती उपशास प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात परवान्यापेक्षा कित्तेक पट जास्त माती उत्खनन याठिकाणी होत आहे. माती उत्खननाबरोबरच जी झाडे माती उपसा करताना अडचण ठरत आहेत, ती झाडे कोणाच्याही परवानगीशिवाय हटवली जात आहेत. हे करताना ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ हे धोरण अवलंबले जात आहे. एकूणच माती उत्खननात सर्व काही अलबेल असल्याचे दिसून येत आहे.

नदीच्या काठावर झाडामुळे मातीचे संचयन होऊन सुपीक जमीन तयार होते. तसेच नदीचा काठ सुरक्षित राहतो. पक्ष्यांना आश्रयस्थान मिळते. मात्र, तीच झाडे तोडली जात असल्याने नदीचे काठ तुटणार असून, पात्र मोठे होणार आहे. पक्ष्यांचे आश्रयस्थान नष्ट होणार आहे. नदीपासून केवळ ५० मीटर अंतरावर हे उत्खनन सुरू आहे. मातीचे ठेकेदार हा उद्योग करीत आहेत. येत्या पावसाळ्यात याचे गंभीर परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.तोडलेल्या झाडांची परस्पर विल्हेवाटसाकुर्डी येथे सध्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराने अनेक झाडे मुळासकट उपटली आहेत. तर काही झाडे बुंध्यापासून तोडण्यात आली आहेत. या वृक्षांचीही परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे. झाडे तोडण्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची परवानगी दिली कुणी, हा प्रश्न आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार