Re-discharge from Koyna Dam | कोयना धरणातून वीजगृहातून पुन्हा विसर्ग सुरू

कोयना धरणातून वीजगृहातून पुन्हा विसर्ग सुरू

ठळक मुद्देकोयना धरणातून वीजगृहातून पुन्हा विसर्ग सुरूकोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी

कोयनानगर : कोयना धरणातून मंगळवारी सकाळी आठ वाजता पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. १६ ऑक्टोबरपासून बंद केलेला पायथा वीजगृह सुरू केला असून, दोन जनित्र संचातून २ हजार १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू केला आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून, आवकही वाढत गेल्याने धरणाचा पाणीसाठा १०४.३८ टीएमसी झाला आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता धरणाच्या पूर्वेकडील वीजनिर्मिती संच असलेल्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.

सकाळी आठ वाजता आकडेवारीनुसार धरणाची पाणी पातळी २१६२.१० फूट पाण्याची आवक २४४५ क्यूसेक व विसर्ग २१०० क्यूसेक एवढा आहे. पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमापकावर झालेल्या पावसाच्या नोंदीनुसार कोयना विभागात गत चोवीस तासांत २३ (एकूण ४४९२) मिमी, नवजा १६ (एकूण ५१९३) मिमी, महाबळेश्वर ० (एकूण ५१९३) मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Re-discharge from Koyna Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.