शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

औंधमध्ये रथोत्सवास प्रारंभ, उदे गं अंबे उदेचा गजर : महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविकांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 17:40 IST

महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंधच्या श्री यमाई देवीच्या रथोत्सवास उदे गं अंबे उदेच्या जयघोषात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने हजारो भाविक औंधनगरीत दाखल झाले आहेत. ​​​​​​​

ठळक मुद्दे देवीची चौपाळ्याजवळ प्रतिष्ठापणा मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते देवीचे पूजन ऐतिहासिक परंपरेनुसार सलामी अजित पवार यांंच्या हस्ते देवीची पालखीत प्रतिष्ठापना

औंध : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंधच्या श्री यमाई देवीच्या रथोत्सवास उदे गं अंबे उदेच्या जयघोषात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने हजारो भाविक औंधनगरीत दाखल झाले आहेत.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व श्री यमाई देवस्थानच्या चीफ ट्रस्टी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हर्षिताराजे पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते ग्रामनिवासिनी श्री यमाई देवी मंदिरामध्ये देवीच्या उत्सवमूर्तीचे विधिवतपणे पूजन करण्यात आले. त्यानंतर देवीची उत्सवमूर्ती सभामंडपात आणण्यात आली.

यावेळी दूध, दही, पुष्प अर्पण करून देवीची पूजा करण्यात आली. त्यानंतर देवीची चौपाळ्याजवळ प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्याठिकाणी मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते देवीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर येथील ऐतिहासिक परंपरेनुसार सलामी दिल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांंच्या हस्ते देवीची पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आली.

पालखीचे मानकरी भोई यांनी वाद्यवृदांच्या गजरात पालखीची फेरी रथापर्यंत नेली. त्याठिकाणी अजित पवार यांच्या हस्ते देवीची ऐतिहासिक दुमजली रथात प्रतिष्ठापना करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत हा रथ ग्रामप्रदक्षिणा करणार आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTempleमंदिर