शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

ऊन्हामुळे रसवंती गृह फुलली

By admin | Updated: March 25, 2017 17:14 IST

तडाखा वाढला : ज्युस, ऊसाचा रस, थंड पेयांना मागणी

आॅनलाईन लोकमत

ओगलेवाडी, दि. २५ : मार्च महिन्यातच सुर्यनारायण कोपला असल्याने वातावरणात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उन्हाच्या तडाक्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने अशात कानावर रसवंतीगृह व गुऱ्हाळावरील घुंगराचा आवाज पडला की, थंडगार ऊसाचा रस पिण्यासाठी प्रवाशी व नागरिकाची पावले आपोआप वळू लागले आहेत.

फेबु्रवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे चार महिने उन्हाळा ऋतूचे असतात. या चार महिन्यात सुयार्ची उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते. सध्या तर मार्च महिन्यातच उष्णतेने तीस अंश सेल्सीअसचा टप्पा ओलांडला आहे. अशा या उष्म्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे म्हणजे आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे.

उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी थंडगार शितपेयांना खूप मागणी असते.ं यामध्ये जास्तकरून ऊसाचा रस व नारळपाणीही पिले जाते. लिंबू, आलेयुक्त ऊसाचा आयुर्वेदिक रस पिल्याने शरीराचे तापमान योग्य राखण्याचे काम होते. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढवून माणसाला फे्र श आणि ताजेतवाणे करीत असतो. वषार्नुवर्षे भारतीयांच्या आवडीचे असणारे हे पेय आजही लोक मोठ्या आवडीने पीत असतात.

या गुऱ्हाळघरांचे वैशिष्टे म्हणजे घुंगराचा मधूर आवाज. गुऱ्हाळाच्या चाकांना लावलेल्या घुंगराच्या मधूर आवाजाने जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. आणि आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देते. दूरवरून येणारा आवाज ओळखूनच माणूस आता रस्त घेवूया, असे ठरवत रसवंतीगृहाकडे मोर्चा वळवतो.

विविध कंपन्यांचे शीतपेय हे शरीराला हानी पोहचविणारे असतात. त्यामुळे सध्या अनेक लोक या शितपेयांपासूर दूर राहत आहेत. तसेच या शीतपेयांतील घटकांपासून वजन वाढण्याचाही धोका असल्याने आरोग्याबाबत चोखवळ असलेली आजची तरूणाई या पेयांना नापसंती दर्शवत आहे. तर भारतीय लिंबू सरबत आणि ऊसाचा ताजा रसाला अधिक पसंती दाखवत आहेत. त्यामुळेच घुंगराच्या आवाजाकडे लहानथोर सर्वांचीच पावले आपोआपच वळताना दिसत आहेत.रस चांगला मात्र, बफार्चे काय?रसवंती गृहावर मिळणारा रस हा सकस आणि आरोग्यवर्धक असतो. मात्र, हा रस थंड करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बफार्बाबत अनेकांच्या मनात शंका असते. तसेच हा बर्फ फोडण्यासाठी वापरली जाणारी पिशवी आणि हा बर्फ साठवून ठेवण्याची पद्धत ही वेगळीच असते. गोणपटामध्ये ठेवण्यात आलेला बर्फ खाण्यासाठी योग्य असेलच असे नाही. याबाबत मात्र, खात्री देता येत नाही.