Ranjit Singh is happy to be elected: Udayan Raje Bhosale | रणजितसिंह निवडून आल्याचा आनंदच वाटतो : उदयनराजे भोसले
फलटण येथील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी खासदार उदयनराजे भोसले आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची भेट झाली.

ठळक मुद्देमी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो, असे सांगितले.फलटणला भेट; संघर्षातून उभी राहिलेली लोकं कधी झुकत नाहीत

फलटण : साता-याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची फलटणमध्ये भेट झाली. यावेळी दोघांनीही दिलखुलास वक्तव्य केले. उदयनराजेंनी तर ‘रणजितसिंह खासदार झाल्याचा आनंदच आहे. संघर्षातून उभी राहिलेली लोकं कोणापुढे झुकत नाहीत,’ असं सांगून पुढील दिशा स्पष्ट केली.  

खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. असे असतानाच खासदार उदयनराजे भोसले हे गुरुवारी फलटणला जिल्हा बँकेचे संचालक दादाराजे खर्डेकर यांच्या निधनानंतर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची विश्रामगृहावर भेट घेतली. जवळपास अर्धा तास ही भेट झाली.

 यातील नेमका तपशील समजला नसला तरी उदयनराजेंनी रणजितसिंह निवडून आल्याचा आनंद असल्याचे सांगितले. तसेच संघर्षातून उभी राहिलेली लोकं कोणापुढे झुकत नाहीत. लोकांसाठी काम करत राहतात. माझ्या भाजप प्रवेशाचे माहीत नाही. मी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो, असे सांगितले.


 


 


Web Title: Ranjit Singh is happy to be elected: Udayan Raje Bhosale
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.